सप्तशृंगी गडावर अवैध धंद्यांना ऊत; पोलिसांचा वचक नाही

सप्तशृंगी गडावर अवैध धंद्यांना ऊत; पोलिसांचा वचक नाही

सप्तशृंगी गड | Saptashrungi Gad

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर (Sapashrungi Gad) छोट्या-मोठ्या गुन्ह्यांचे प्रमाण अनेक दिवसांपासून वाढले आहे. याचे कारण असे की सप्तशृंगगडावर पोलीस चौकी असून या पोलीस चौकीत एकही पोलीस नसल्याची खंत भाविकांकडून व ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे...

गडावरील पोलीस चौकी (Police Station) अडचण नसून खोळंबा बनल्याने गुन्ह्यांमध्ये वाढ होत चालली असून पोलीस चौकी कार्यान्वित करण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वीच सप्तशृंगगडावरील एका रहिवाशी व हैदराबाद (Hyderabad) तेलंगणा येथील भाविकांमध्ये किरकोळ कारणावरून तुफान हाणामारी झाली येथील रहिवासीने महिला पुरुष व लहान मुलांना बेदम मारहाण (Beaten) करण्यात आली.

चौकीत पोलीस नसल्याने दाद मागायची कुणाकडे? असा गंभीर प्रश्न भाविकांना पडला आहे सप्तशृंगी गडावर खाकी वर्दीचा, धाक नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे.

सप्तशृंगी गडावर अवैध गांजा (Ganja) विक्रीचा सुळसुळाट सुरू असून तरुण मुले या गांजाच्या आहारी गेले असल्याचे चित्र दिसून येत आहे. गांजाच्या नशेमध्ये धुंद होऊन बायकांना शिवीगाळ करणे, मारहाण करणे, वाहनांच्या काचा फोडणे असे सर्रास प्रकार पोलिसांचा धाक नसल्याने घडत आहे तसेच बस स्थानकाजवळ शिवालय तलाव उतरती पायरीजवळ तरुण मुलांचे टोळकेचे टोळके गांजा पिण्यासाठी आढळून येत आहे.

या गांजा पिणाऱ्या टोळक्या पोलीस उद्ध्वस्त करतील का? असा सवाल ग्रामस्थांकडून व भाविकांकडून उपस्थित केला जात आहे. यामुळे भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच गांजा पिऊन धूम स्टाइल गाडी चालवणे, रात्रीचे एक ते दोन वाजेपर्यंत गावातून मोठ्याने ओरडणे, टोळीटोळीने चौकाचौकात थांबणे, यामुळे पोलिसांचा वचक न राहिल्याने आपले कोणीच काही करू शकत नाही या आवेषात तरुण मुले राहत असल्याने पोलिसांचा धाक नसल्याने अजून किती दिवस असे प्रकार सहन करायचे असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

सप्तशृंगी गडावर अवैध धंद्यांना ऊत; पोलिसांचा वचक नाही
Photo, Video : दोन वर्षानंतर ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज

गडावर दररोज हजारो भाविक दर्शनासाठी व पर्यटनासाठी गर्दी करीत असतात या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी स्वतंत्र अशी पोलीस चौकी (Police Station) पोलीस निरीक्षक, हवालदार, पोलीस यंत्रणा, महिला पोलिस यंत्रणा असणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिली. संस्थांनी पोलीस चौकी बांधून दिली आहे परंतु ती फक्त शोभेची वस्तू म्हणून उभी आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी एक चार चाकी वाहन जाळण्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर घडला. मात्र येथे पोलिसच उपस्थित नसल्याने असे प्रकार घडत आहे.

चैत्र उत्सव, नवरात्र उत्सव यात्रा कालावधीत पोलीस चौकी (Police station) उघडी करून ठेवतात. यात्रा संपली की पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती या पोलीस चौकीची झाली आहे. येथे पोलिस चौकीत पोलीस आता तरी थांबतील का? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहे. सप्तशृंगगड पोलीस चौकीला कोणी पोलीस देता का पोलीस? अशी आर्त हाक भाविकांकडून केली जात आहे.

सप्तशृंगी गडावर अवैध धंद्यांना ऊत; पोलिसांचा वचक नाही
'राज' इशाऱ्यानंतर नाशिक पोलीस अलर्ट मोडवर

येथील पोलीस चौकी फक्त यात्रा उत्सव काळात उघडली जाते. तेव्हा पोलिसांची रेलचेल दिसते. यात्रा संपली की पोलीस चौकीला कुलूप लावले जाते. ती नंतर सहा महिन्यानीचं परत उघडली जाते. येथे भाविकांना मारहाण करणे, गांजा पिऊन शिवीगाळ करणे, भाविकांचे पाकीट मारणे, मोबाईल चोरणे, महिलांचे दागिने चोरणे असे गुन्हे गडावर घडत असूनही पोलीस चौकी बंद असल्यामुळे असे प्रकार घडत आहेत.

मधुकर गवळी सप्तशृंगगड ग्रामस्थ

पोलिस चौकीत कायमस्वरूपी दोन-तीन पोलीस असणे गरजेचे आहे.तसेच रात्री 10 वाजेनंतर गावांमध्ये पेट्रोलिंग गरजेचे आहे. पोलिसांचा धाक नसल्याने येथे गुंडाराज वाढला आहे.

सुनिल जगताप, भाविक जळगाव

सप्तशृंगी गडावर बस स्थानक येथे काळी पिवळी वाहन चालक मोठ्या प्रमाणात रस्त्यात वाहने लावतात व मद्यपान करून वाहने चालवतात, शिवीगाळ करतात. यासाठी बसस्थानक परिसरात एस टी वाहक, चालकालादेखील वाहन चालवण्यास कसरत करावी लागते

सचिन आहिरे नाशिक, भाविक

Related Stories

No stories found.