आइस्क्रीम उद्योगाचा व्यवसाय ५ बिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट्य - आयआयसीएमए

आइस्क्रीम उद्योगाचा व्यवसाय ५ बिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट्य - आयआयसीएमए

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आइस्क्रीम उद्योगाचा व्यवसाय (Business of Ice Cream Industry) ५ बिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट्य असोसिएशनचे असून आइस्क्रीम उद्योगाचे वितरण व्यवस्था, दर्जेदार उत्पादन, निर्यात क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार असल्याचे मत सचिव आशिष नहार यांनी कोलकता येथे आयोजित आयआयसीई आइस्क्रीम प्रदर्शनादरम्यान (Iice Ice Cream Exhibition) व्यक्त केले...

आशियातील सर्वात मोठे आइस्क्रीम प्रदर्शनाचे आयोजन कोलकता (Kolkata) येथे इंडियन आइस्क्रीम मॅनुफॅक्टरर्स असोसिएशनच्या (IICMA) वतीने आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगमंत्री डॉ. शशी पांजा (Industries Minister Dr. Shashi Panja) यांच्या हस्ते करण्यात आले. या दरम्यान आइस्क्रीम उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारकडून अधिकाधिक प्रयत्न सुरु असून उद्योगांनी नवीन तंत्रज्ञानाची व नवीन दर्जेदार उत्पादनासाठी प्रयत्न करणे महत्वाचे असल्याचे डॉ. पांजा यांनी सांगितले. तसेच आशियातील सर्वात मोठ्या प्रदर्शनाचे आयोजन हे भविष्यात नक्कीच सहभागी उद्योगांसाठी आशादायी असून त्यामुळे अनेक व्यवसायाच्या संधी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत डॉ. पांजा यांनी प्रदर्शनाचे कौतुक केले.

कोलकत्ता येथील आयोजित आइस्क्रीम प्रदर्शनात २० देशाच्या २०० हून अधिक उद्योगांनी आपला सहभाग नोंदविला. यात आइस्क्रीम उत्पनासाठी नवीन तंत्रज्ञान असलेल्या मशीनरी, कच्चा माल, पॅकिजिंग मटेरियल, व सर्विसेस देणाऱ्या उद्योगांचे स्टॉल होते. तीन दिवसीय प्रदर्शनात अनेक मान्यवर व नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देत आइस्क्रीम उद्योगाला चालना दिली. आइस्क्रीम उद्योगाशी संबंधित उद्योगांनी (Industries) आपले नावीन्य व दर्जेदार उत्पादनाची माहिती याप्रसंगी भेट दिलेल्या मान्यवरांना दिली. तीन दिवसीय या प्रदर्शनात जवळपास एक हजार कोटींच्या आसपास उलाढाल झाल्याचे निदर्शनास आले.

इंडियन आइस्क्रीम मॅनुफॅक्टरर्स असोसिएशनयांच्या द्वारे आयोजित करण्यात येणारे हे ११ वे प्रदर्शन होते. याआधी दिल्ली, बेंगलुरू, चेन्नई, हैद्राबाद, अहमदाबाद येथे यशस्वी आयोजन करण्यात आले. इंडियन आइस्क्रीम मॅनुफॅक्टरर्स असोसिएशन २०२३-२०२४ या वर्षात त्रिसुत्री कार्यक्रम राबविणार आहे. यात डिजिटल मार्केटिंग, निर्यात क्षमता वाढविणे व नवीन तंत्रज्ञानाची ओळख सर्व सभासदांना देण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणार असल्याची माहिती आशिष नहार यांनी दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com