इग्नू जुलै सत्र प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

इग्नू जुलै सत्र प्रवेश अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

नाशिक | Nashik

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जुलै २०२१ पासून सुरू होणाऱ्या सत्रासाठी पुननोंदणी करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. इग्नूने जुलै सत्रासाठी ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुनर्नोदणी करता येणार आहे. इग्नूतर्फे नोटिफिकेशन जाहीर (Notification Updated) करुन यासंदर्भात माहिती देण्यात आली...

यापूर्वी इग्नू जुलै २०२१ ची पुनर नोंदणी १६ ऑगस्ट २०२१ पर्यंत करता येत होती. इग्नूकडून यूजी, पीजी आणि डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या (Diploma Syllabus) सेमिस्टर प्रणालीच्या ज्या विद्यार्थ्यांना काही कारणामुळे जुलै सत्रासाठी पुन्हा नोंदणी करता आली नाही, त्यांच्यासाठी आता आणखी एक संधी आहे.

इग्नूने सर्व विद्यार्थ्यांसाठी पुन्हा नोंदणी ३१ ऑगस्ट पर्यंत करता येणार आहे. शेवटच्या तारखेला विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने वेबसाइटवर तांत्रिक अडचणी (Technical Issues) येण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ३१ ऑगस्टची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशी करा पुनर्नोदणी

इग्नूचे विद्यार्थी जुलै २०२१ साठी विद्यापीठाचे रजिस्ट्रेशन पोर्टल (Registration Portal) onlinerr.ignou.ac.in वर पुनर्नोदणी करु शकतात. पोर्टलवर गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेजवरील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. पुनर्नोदणी करताना, विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित कोर्सची फी देखील भरावी लागेल. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग (Internet Banking) तसेच BHIM ॲपसह UPI द्वारे ही फीस भरता येईल.

नव्या प्रवेशाची तारीख वाढली

इग्नूने जुलै २०२१ पासून सुरू होणाऱ्या विविध यूजी, पीजी आणि इतर अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवली. इग्नूमध्ये ओपन डिस्टन्स लर्निंग (Open Distance Learning) (ओडीएल) अभ्यासक्रमांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. इग्नू जुलै २०२१ सत्रासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com