एक्स्प्रेसला थांबा देण्यास टाळाटाळ; नांदगावकर कृती समितीचा आंदोलन पवित्रा

एक्स्प्रेसला थांबा देण्यास टाळाटाळ; नांदगावकर कृती समितीचा आंदोलन पवित्रा

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

करोना (corona) संक्रमणाचा उद्रेक रोखण्यासाठी नांदगाव रेल्वे स्थानकावरील (Nandgaon Railway Station) काशी (Kashi), कामायनी (Kamayani), महानगरी (Mahanagari), झेलम, कुशीनगर एक्स्प्रेससह इतर रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनातर्फे (Railway Administration) रद्द करण्यात आल्या होत्या.

आजपर्यंत या एक्स्प्रेस सुरू न करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. स्थानकावर पुर्वीप्रमाणेच सर्व एक्स्प्रेसला थांबे (stop) मिळावेत या मागणीसाठी आम्ही नांदगावकर कृती समितीने संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.

आपल्या हक्काच्या एक्स्प्रेस रेल्वे (Express train) थांबविण्यासाठी संघर्ष करण्यासाठी सज्ज व्हा अशा आशयाचे बॅनर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहे. एक्स्प्रेसला नांदगावी थांबा न मिळाल्यास व्यापक आंदोलन (agitation) हाती घेण्याचा निर्णय कृती समितीतर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन (independence day) साजरा झाल्यानंतर घेतला जाणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

करोना काळापासून आजपर्यंत नांदगाव रेल्वे स्थानकावरील (Nandgaon Railway Station) काशी, कामायनी, महानगरी, झेलम, कुशीनगर इतर एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे रेल्वे प्रशासनाने रद्दच ठेवले आहेत. करोना काळात रेल्वेला उत्पन्न मिळाले नाही याचे कारण थांबे रद्द करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे पुढे करण्यात आले आहे.

संपूर्ण राज्यात स्थानकांवर रेल्वे गाड्यांचे थांबे पुर्ववत झाले असतांना नांदगाव (nandgaon) स्थानकावरील गाड्यांचे थांबे पुर्ववत करण्यात येत नाही? असा सवाल रेल्वेला थांबा नसल्यामुळे होत असलेल्या हालअपेष्टांनी त्रस्त नांदगावकरांसह तालुक्यातील, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, प्रवाशी वर्गातर्फे उपस्थित करण्यात येत असून रेल्वे प्रशासनाच्या या तुघलकी धोरणाविरूध्द तीव्र असंतोष पसरला आहे.

रेल्वेंच्या थांब्यासाठी केद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी संसदेत आवाज उठवित रेल्वेमंत्र्यांना साकडे घातले आहे. विविध राजकीय पक्षांसह प्रवाशी संघटनांतर्फे देखील निवेदने (memorandum) देण्यात येवून थांबे सुरू करण्याचे साकडे सातत्याने घालण्यात आले आहेत. मात्र दोन वर्ष उलटली तरी मागणीची दखल घेतली गेली नाही. आता करोना संपला तरी रेल्वे प्रशासन केंद्रीय मंत्री पवार यांच्या मागणीची देखील दखल घेत नसल्याने प्रवाशांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उत्पन्नाचे कारण दाखवत रेल्वे प्रशासन जाणीवपुर्वक त्रास देत असल्याचा आरोप प्रवाशांतर्फे केला जात आहे.

काशी, जनता, पुणे-भुसावळ हुतात्मा, महानगरी, झेलम, शालीमार, कामयानी, कृषिनगर एक्सप्रेस सर्व थांबे घेत असून फक्त नांदगावचा थांबा काढण्यात आला आहे. त्यामुळे या गाड्यांचे थांबे पुर्ववत करण्यासाठी आम्ही नांदगावकर कृती समितीतर्फे आपल्या हक्काच्या रेल्वेगाड्या थांबविण्यासाठी आता संघर्ष करण्यासाठी सज्ज व्हा, अशी साद नांदगावकर प्रवाशांना घालण्यात आली आहे. या संदर्भात शहरात ठिकठिकाणी बॅनर्स देखील लावण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना नांदगावकरांनी भरभरून प्रेम दिले आहे. डॉ. पवार हे नांदगावकरांंच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. नांदगाव रेल्वे स्थानकावरील लवकरच रेल्वे गाड्यांचे थांबे पुर्ववत करणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष गणेश शिदे यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com