इगतपुरीत व्यावसायिकांची छुप्या पद्धतीने दुकाने सुरू

इगतपुरीत व्यावसायिकांची छुप्या पद्धतीने दुकाने सुरू
प्रातिनिधिक फोटो

नाशिक | Nashik

तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून अशातच स्थानिक व्यापारी वर्ग नियमांना झुगारून दुकाने उघडी ठेवत असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.

इगतपुरी शहरातील नवा बाजार, पटेल चौक, बजरंग वाडा, खालची पेठ, आग्रा रोड, कोकणी मस्जिद आदी परिसरातील व्यापाऱ्यांनी शासन व प्रशासनाच्या आदेशाला ठेंगा दाखवत शनिवारी व रविवारी अर्ध शटर वर करून , मागच्या दरवाजाने, बोळीतून छुप्या मार्गाने व्यवहार सुरू ठेवल्याचे नागरिकांनी सांगितले.

विशेष म्हणजे, प्रशासनाकडूनही त्यांना कोणताच विरोध होत नसल्याचे दिसून येत आहे. इगतपुरी तालुक्यात दररोज ४० ते ५० पेशंट वाढत आहेत.

याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र प्रशासनाच्या आदेशाची पायमल्ली करत व्यापारी वर्गासह इतरही छोटे मोठे व्यावसायिक छुप्या पद्धतीने व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com