इगतपुरी तालुक्यातील गट - गणांचे आरक्षण जाहीर; इच्छुकांचा हिरमोड

इगतपुरी तालुक्यातील गट - गणांचे आरक्षण जाहीर; इच्छुकांचा हिरमोड

नाशिक । Nashik

इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गट (Zilla Parishad groups) आणि गणांची आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. गटांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक (Collector's Office Nashik) येथे तर गणांची आरक्षण सोडत इगतपुरी पंचायत समिती (Igatpuri Panchayat Samiti) कार्यालयात काढण्यात आली...

यावेळी इगतपुरी तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गटांपैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी २, सर्वसाधारण महिला १, अनुसूचित जमाती (महिला) १, अनुसूचित जाती १ असे आरक्षण जाहीर झाले आहे. तर १० पंचायत समिती गणांपैकी अनुसूचित जमातीसाठी २, अनुसूचित जमाती (महिला) २, अनुसूचित जातीसाठी १, सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३, सर्वसाधारण महिला २ असे आरक्षण जाहीर झाले आहे.

जिल्हा परिषद गट आरक्षण

खंबाळे (जुना शिरसाठे गट ) - सर्वसाधारण महिला

धामणगाव (जुना खेड गट) - सर्वसाधारण

नांदगाव सदो - सर्वसाधारण

घोटी - अनुसूचित जमाती (महिला)

वाडीवऱ्हे - अनुसूचित जाती

पंचायत समिती गण आरक्षण

घोटी बुद्रुक, मुंढेगाव - अनुसूचित जमाती

नांदगाव सदो, वाडीवऱ्हे - अनुसूचित जमाती महिला

धामणगाव, कावनई, बेलगाव तऱ्हाळे - सर्वसाधारण

खंबाळे, काळुस्ते - सर्वसाधारण महिला

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com