तळेगाव डॅम लिकेज; इगतपुरीत भीषण पाणीटंचाईची शक्यता

नाशिक | प्रतिनिधी Nashik

इगतपुरी (Igatpuri) येथील महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या (Maharashtra Jeevan Pradhikaran) तळेगाव डॅमला (Talegaon Dam) सुमारे दहा ठिकाणी भगदाड पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे....

हा डॅम इगतपुरी शहर (Igatpuri City) वासियाना पाणी पुरवठा करतो. उन्हाळ्यात नगरपालिकेचा तलाव आटल्यानंतर याच डॅमवर इगतपुरीकरांची तहान भागवली जाते.

पावसाचे माहेर घर असलेल्या इगतपुरीत आजही आठवड्यातून केवळ तीनदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यातच मोठ्या प्रमाणात पाणी वाया (Water wastage due to dam leakage) जात असल्याने भविष्यात पाणी टंचाई (Water Scarcity) ची मोठी समस्या उभी राहण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

41.24 द.ल.घ.फु क्षमता असलेला हा कृत्रीम बंधारा 1985 ला तयार होऊन पाणी अडवायला सुरवात झाली तर 1987 ला महिंद्रा कंपनीला पहिले पाण्याचे कनेक्शन देऊन वाटपला सुरवात करण्यात आली होती.

सध्या हा प्रकल्प महाराष्ट्र जिवन प्राधिकरणच्या अख्यत्यरीत असुन इगतपुरी नगर परिषदेला (Igatpuri nagar parishad) पाणी पुरवठा याद्वारे केला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com