इगतपुरी रेव्ह पार्टी : बंगला मालक रनवीर सोनीला मुंबईतुन अटक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई; सात दिवसाची पोलीस कोठडी
इगतपुरी रेव्ह पार्टी : बंगला मालक रनवीर सोनीला मुंबईतुन अटक

इगतपुरी | Igatpuri

इगतपुरीत झालेल्या रेव्ह पार्टीतील (Igatpuri Rave Party) बंगला मालक रनवीर सोनीला (Villa Owner Ranveer Soni) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Crime Investigation Squad) मुंबईतुन (Mumbai) अटक केली. रनवीर सोनीला आज इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ दिवसाची पोलीस कोठडी (Police Closet) सुनावली आहे.

मुंबई आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) इगतपुरीतील स्काय ताज व स्काय लगुन या अलिशान बंगल्यात चाललेल्या रेव्ह पार्टीवर ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील( Sp Sachin Patil) यांच्या पथकाने छापा टाकुन रेव्ह पार्टी उधळुन लावली. या छाप्यात ३१ जणांना पोलीसांनी अटक केली होती. या सर्वांना ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

यात स्काय ताज व स्काय लगुन या बंगल्याचा मालक फरार झाला होता मात्र गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे व त्यांच्या सहकारी नवनाथ गुरुळे, पोलीस हवालदार संदीप हांडगे, सचिन पिंगळ आदींनी या बंगल्याचा मालक रनवीर सोनी याला मंगळवारी मुंबईत जाऊन अटक केली.

आज बुधवारी रनवीर सोनी याला इगतपुरी न्यायालयात (Igatpuri Court) हजर केले असता न्यायमुर्ती आर. एन. खान यांनी त्यास ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी सरकारी वकील निर्लेकर यांनी न्यायालयात युक्तीवाद करतांना सांगितले की बंगला मालक रनवीर सोनी याने बंगला भाड्याने देतांना शहानिशा न करता जास्त रकमेच्या अमिषापोटी बंगला भाड्याने दिला.

यानंतर वास्तव्यास असलेल्या मुंबईच्या या लोकांनी रेव्ह पार्टी करत चरस गांजा व कोकीनचे सेवन केले. त्याच प्रमाणे अटक असलेल्या नायझेरीयन व्यक्तिने हे सर्व मादक पदार्थ पुरवले असुन हे मादक पदार्थ कोठुन आणले या बाबत मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवल्याने रनवीर सोनीला ७ दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केली.

आता या बाबत अधिक तपास पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश कुटे, नवनाथ गुरुळे, संदीप हांडगे, सचिन पिंगळ आदी करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com