इगतपुरी : पावसाने पुन्हा दडी मारल्याने भात आवण्या रखडल्या
नाशिक

इगतपुरी : पावसाने पुन्हा दडी मारल्याने भात आवण्या रखडल्या

एकीकडे मजुरांचा तुटवडा : दुसरीकडे कोरोनाची धास्ती

Abhay Puntambekar

घोटी । जाकीर शेख Ghoti / Igatpuri

इगतपुरी तालुका पावसाचा तालुका असूनही या तालुक्याकडे सध्या पावसाने चांगलीच पाठ फिरवली आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या या इगतपुरी तालुक्यात जुलै महिना अर्ध्यावर येऊनही अद्यापही हा तालुका पावसाअभावी कोरडाच आहे. गेल्या पंधरवाड्यात अवघ्या दोन तीन दिवस पाऊस झाला. मात्र पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. पावसाने दडी मारल्याने भाताच्या आवण्याही रखडल्या आहेत.

इगतपुरी तालुका हा महाराष्ट्राची चेरापुंजी समजली जाते. या तालुक्यात जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस या तालुक्यात होतो जुलै महिन्यात या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन धरणेही अर्ध्यावर भरली जातात. यावेळी जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यात दोन दिवस पाऊस झाला त्या पावसाच्या आधारावर तालुक्यात शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली. पेरणीसाठी, लागवडीसाठी मोठया प्रमाणात खर्च करण्यात आला. मात्र हा खर्च व्यर्थ जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

तालुक्याच्या पश्चिम पट्यात जेमतेम आवण्या अर्थात भात लागवडीची तुरळक कामे झाली. मात्र पूर्व भाग अद्यापही पावसाअभावी कोरडाठाक असल्याने भात लागवडीची कामे रखडली आहेत तसेच अनेक भाताची रोपेही वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.या तालुक्यात एकीकडे पाऊस नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. असे असूनही भात लागवडीसाठी मजूर टंचाई निर्माण झाली. हे तसेच तालुक्यात ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी करोना रूग्ण आढळून येत नसल्याने त्याचाही परिणाम मजूर टंचाईवर झाल्याचे चित्र दिसत आहे.

पावसाने पुन्हा दडी मारल्याने सर्वच घटकात चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे , गावागावात शेतीची कामे रखडली आहेत. तालुक्यात पुन्हा दमदार पावसाला सुरुवात होण्याची गरज आहे अन्यथा शेतकरी वर्गात चिंतेची भर पडेल.

Deshdoot
www.deshdoot.com