इगतपुरी
इगतपुरी
नाशिक

इगतपुरी - कसारा घाट हरवला धुक्यात...

वाहन चालकांची तारांबळ

Gokul Pawar

Gokul Pawar

इगतपुरी । Igatpuri

इगतपुरी तालुक्यात दोन महीन्याच्या प्रदीर्ग प्रतिक्षेनंतर चार दिवसांपासुन जोरदार पावसात सुरुवात झाली आहे. जोरदार पावसाबरोबच दाट धुके पसरत असुन अगदी दिवसाही २० फुटा पर्यंत असलेल्या वस्तु, वाहने नीट दिसत नाही.

मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात तर जास्तच धुके पसरत असुन जागोजागी डोंगरावरून पडणाऱ्या पाण्यामुळे धबधबेही निर्माण झाले असुन याचा फटका वाहन चालकांना बसत आहे.

नाशिकहुन मुंबईला जाणाऱ्या महामार्गावरील नवीन कसारा घाट व मुंबईहुन नाशिकला येणाऱ्या जुन्या कसारा घाटात दाट धुके पडत असल्याने दिवसाही वाहनांना हेड लाईट लावुन देखील समोरील वाहने नीट दिसत नाही. या धुक्यामुळे कसारा घाटातील दोन्ही बाजुची वाहतुक संथ गतीने सुरु आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com