इगतपुरी : यंदाचा घाटनदेवी नवरात्रौत्सव रद्द

विश्वस्त मंडळ नियोजन बैठक : जिल्हा पोलीस प्रशासनाचे निर्देश
इगतपुरी : यंदाचा घाटनदेवी नवरात्रौत्सव रद्द

इगतपुरी | Igatpuri

इगतपुरी येथील प्रसिद्ध घाटनदेवीचा नवरात्र उत्सव रद्द करण्यात आला असून याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला.

शनिवार (दि.१७) पासुन नवरात्रौ उत्सव सुरू होत असुन सध्या कोविड १९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासना कडून प्राप्त झालेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्या आधारे सध्याचा नवरात्र उत्सव साजरा होणार नाही.

या पार्श्वभूमीवर घाटनदेवी विश्वस्त मंडळाने यात्रा उत्सव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असुन भाविकांना दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी करू नये, कोणत्याही प्रकारचे नवस अथवा पुजा विधी करण्यास येवु नये असे आवाहन नियोजन बैठकीत केले.

कोविड १९ च्या संसर्गाचा धोका पाहता स्थानिक पोलीस प्रशासनाने मंदिर परिसर व या भागातील रस्ते बंद करण्याचा निर्णय घेत भाविकांना मंदिरात प्रवेश नसणार असल्याचे सांगीतले.

घाटनदेवी मंदिर नवरात्र उत्सव संबंधात उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे, तालुका कृषी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे, गोपनिय पोलीस विनोद गोसावी यासह घाटनदेवी विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत घाटनदेवी मंदिर सभा मंडपात नियोजन बैठक संपन्न झाली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com