इगतपुरी : भाम धरण ओव्हर फ्लो, दारणा धरण साठ्यात वाढ

शेतकऱ्यांना दिलासा
भाम धरण
भाम धरण

घोटी | Ghoti

काळूस्ते येथील पावणेतीन टीएमसी पाण्याची क्षमता असलेले भाम धरण पूर्ण क्षमतेने भरून ओवरफ्लो झाले आहे. यामुळे पाण्याची चिंता मिटली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

इगतपुरी तालुक्यातील परिसरात पाच ते सहा दिवसांपासून समाधान कारक पाऊस होत असून तालुक्यातील धरणांत पाण्याचा जलसाठा वाढला आहे. यामुळे पिकांना उभारी आली असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

तालुक्यातील भाम धरण ओव्हर फ्लो झाले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भाम धरणामुळे दारणा धरणात जलसाठा वाढण्यास मदत होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com