बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळावी म्हणून इगतपुरीत आंदोलन

बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळावी म्हणून इगतपुरीत आंदोलन

नाशिक | Nashik

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला (Bullock cart race) परवानगी द्यावी या मागणीसाठी मुंबई आग्रा महामार्गावरील (Mumbai Agra Highway) टाके-घोटी येथे इगतपुरी (Igatpuri Taluka) तालुका बैलगाडा शौकीण शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) व तहसीलदार परमेश्वर कासुळे (Tahsildar Parmeshwer Kasule) यांना बैलगाडा शर्यती सुरू कराव्यात या मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षाची परंपरा आहे. पारंपारीक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणुन बैलगाडा शर्यतीकडे पाहीले जाते. तामिळनाडु व कर्नाटक या राज्यांमध्ये बैलगाडा शर्यती बाबत कायदा केलेला आहे.

बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे देसी गाय-बैलांचे संगोपन चांगल्या प्रकारे केले जाते. शर्यत बंदीमुळे देसी गाय बैलांचे उपयुक्तता मुल्य धोक्यात आल्यामुळे जतन संवर्धनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच शर्यत बंदीमुळे शेतकऱ्यांची गाय-बैल संगोपनाची प्रेरणाच नष्ट होत आहे.

ग्रामीण भागात (Rural Area) देवदेवतांच्या यात्रेमध्ये बैलांचे प्रदर्शन, विक्री व शर्यती आयोजित करण्याची परंपरा आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठी आर्थिक उलाढाल होते. यासाठी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात (High Court) प्रलंबित असलेली सुनावणी तात्काळ घेतली जावी याबाबत प्रयत्न व्हावेत, यासंबंधी चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या प्रतिनिधी समवेत मा. मुख्यमंत्री यांचे दालनात बैठक घेतली जावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनात आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, माजी जि. प. सदस्य संदीप गुळवे, गोरख बोडके आदींसह शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com