मास्क नसल्यास दंडात्मक कारवाई करा

आढावा बैठकीत आ. कांदे यांचे निर्देश
मास्क नसल्यास दंडात्मक कारवाई करा
करोना

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

ओमायक्रॉन (omicron) विषाणूचा वेगाने वाढत असलेला संसर्ग रोखण्यासाठी मास्क (mask) हे प्रभावी साधन असल्याने शासनाने ते तोंडावर लावणे बंधनकारक केले आहे. परंतू नागरिक अद्यापही मास्कचा वापर (Use of mask) करत नसल्याचे दिसून येत आहे. याविषयी दोन दिवस जनजागृती (Awareness) प्रशासन यंत्रणेने करावी त्यानंतर दंडात्मक कारवाई (Punitive action) करण्यास प्रारंभ करावा, असे निर्देश आ. सुहास कांदे (mla suhas kande) यांनी येथे बोलतांना दिले.

येथील शासकीय विश्रामगृहात करोनाच्या (corona) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक (Meeting of Administrative Officers) घेत आ. कांदे यांनी उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी नागरीक मास्कचा वापर करीत नसल्यासंदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेत आ. कांदे यांनी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना केल्या. तहसीलदार (Tehsildar) तालुक्याचे प्रमुख असून सर्व अधिकार्‍यांशी समन्वय साधून नागरिकांचे लसीकरण (vaccination) व करोना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे कामी लक्ष देणे आवश्यक असल्याचे आ. कांदे यांनी सांगितले.

यावेळी नांदगाव-मनमाड (Nandgaon-Manmad) शहरातील उपलब्ध ऑक्सिजन बेड (Oxygen bed) उपलब्धता, वैद्यकीय उपकरणे (Medical equipment), औषधांचा साठा, बेड (bed), रूटीन पेशंटची इतरत्र व्यवस्था करणे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. संपूर्ण तालुक्यात लसीकरणावर भर देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, प्रथम-द्वितीय डोस पूर्ण करण्यावर तसेच पंधरा वर्ष पुढील युवकांचे 100 टक्के लसीकरण करून घेण्यावर भर देणे,

वाड्या-वस्त्यांवर पोहोचून लसीकरण (vaccination) करून घेणे, उपचाराविना कोणीही वंचित राहू नये यासाठी प्राथमिकता दिला जावी. नांदगाव (nandgaon) नगरपालिकेचे (Municipalitie) नगरसेवक (Corporator) आपल्या वार्डात लसीकरण कॅम्प (Vaccination Camp) लावतील त्यासाठी अधिकार्‍यांनी सहकार्य करावे. लसीकरणासाठी गावोगावी शिबीर लावा लोकांना बाहेर काढण्याची जबाबदारी घेण्यास आपल्यासह शिवसैनिक (shivsainik) तयार असल्याचे आ. कांदे यांनी सांगितले.

यावेळी तहसीलदार सिद्धार्थ मोरे, मुख्याधिकारी विवेक धांडे, मनमाड नगर परिषद मुख्याधिकारी मुंढे, पो.नि. रामेश्वर गाढे, गट विकास अधिकारी गणेश चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद नरवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जगताप, गटशिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, जगदीश पाटील, माजी सभापती विलास आहेर, किरण देवरे, प्रमोद भाबड, सागर हिरे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com