कांदा विक्रीनंतर अडचणी येत असतील तर तक्रार करा- भारत दिघोळे
नाशिक

कांदा विक्रीनंतर अडचणी येत असतील तर तक्रार करा- भारत दिघोळे

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे आवाहन

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केल्यानंतर काही अडचणी येत असतील तर त्यांनी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या ७७९८१८६४८७ या व्हाट्सअप तक्रार नंबर तुमची तक्रार नाव व पत्त्यासह पाठवावी,असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे,राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी केले आहे.

राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना जाहीर आवाहन करण्यात येते की, आपण आपापल्या तालुक्यातील , जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री करण्यास घेऊन जात असताना कोणत्याही बाजार समितीमध्ये आपणास पुढील गोष्टींचा अनुभव येत असल्यास महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या ७७९८१८६४८७ या व्हाट्सअप तक्रार नंबर तुमची तक्रार नाव व पत्त्यासह पाठवा.

यामध्ये कांद्याच्या विक्रीनंतर तात्काळ पैसे रोख स्वरूपात न देणे किंवा तात्काळ आरटीजीएस,एनइएफटी न करणे.एकदा कांद्याचा लिलाव झाल्यानंतर परत व्यापारी खळ्यांवर कांदे खराब आहे,असे कारण सांगून वजन किंवा भाव कमी करणे.राज्यातील कोणत्याही बाजार समितीमध्ये कांदा उत्पादकांना नाहक त्रास देण्याचे काम होत असल्यास संबंधित बाजार समितीला जाब विचारून असे प्रकार तात्काळ बंद केले जातील.त्यामुळे कांदा उत्पादकांनी संपर्क करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे,राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी केले आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com