अफवा पसरविल्यास गुन्हा नोंदवू : डॉ. डेर्ले
नाशिक

अफवा पसरविल्यास गुन्हा नोंदवू : डॉ. डेर्ले

निफाड डॉक्टर्स असोसिएशनतर्फे इशारा

Abhay Puntambekar

निफाड। प्रतिनिधी Niphad

करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शासनाने खाजगी वैद्यकिय व्यवसायिकांना रुग्णालये सुरु ठेवत उपचार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी डॉक्टरांकडून सुरक्षित साधनांचा वापर करत रुग्णांवर उपचार केले जात आहेत. नुकतेच निफाड शहरात करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने दोन डॉक्टरांचा करोना अहवाल सकारात्मक आला होता. त्यामुळे निफाड परिसरात डॉक्टरांचा एक ग्रुपच करोनाबाधित असल्याच्या अफवा पसरवत सामान्य नागरिक रुग्णांना घाबरविले जात आहे. अशा अफवा पसरवून जनतेत गैरसमज निर्माण करु नये अन्यथा अशा व्यक्तींवर गुन्हा नोंदविण्यात येईल असा इशारा निफाड शहर डॉक्टर असोसिएशन अध्यक्ष डॉ.निलेश डेर्ले यांनी दिला आहे.

निफाड शहरात डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाराद्वारे कळविले आहे की, संपूर्ण जगात करोनाने कहर केला आहे. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. करोनाचा प्रसार बघता अनेक ठिकाणी डॉक्टरच रुग्णसेवा करतांना करोनाबाधित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या जागतिक संकटावर मात करुन रुग्णसेवेचे व्रत ईमानेईतबारे करत आहेत. परंतू काही असामाजिक लोक मात्र डॉक्टर्स बद्दलच अफवा पसरवत आहेत. कारण रुग्णसेवा करत असतांना ि्नफाडच्या दोन डॉक्टर्संना करोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आल्यावर संबंधित डॉक्टरांवर नाशिकला उपचार सुरु असून त्यांची प्रकृती देखील स्थिर आहे.

करोना महामारीच्या काळात डॉक्टरांना रुग्णांचे विनाविघ्न काम करू द्यावे. तसेच कोणत्याही अफवा पसरवून जनतेत गैरसमज निर्माण करु नये अन्यथा वैद्यकिय सेवेचे काम बंद करावे लागेल. शासकिय नियमांचे पालन करत वैद्यकिय सेवा सुरु आहे. त्यात विघ्न आणून वैद्यकिय क्षेत्राला बदनाम करु नये असे निफाड डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निलेश डेर्ले, उपाध्यक्ष डॉ. रोहित धोक्रट, सेक्रेटरी डॉ. भूषण राठी, डॉ.नितीन धारराव, डॉ.अरुण कातकाडे, डॉ.रुपेश वाघ, डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.राहुल तातेड, डॉ. विलास नाठे, डॉ. अमोल पवार, डॉ. अमोल घुगे, डॉ. भूषण सानप, डॉ. सुनिल कापसे, डॉ.ऋषीकेश दौंड आदींसह निफाड डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com