पांजरपोळची जागा भूसंपादित केल्यास उद्योजकांना जमीन देणे शक्य : फरांदे
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक शहराचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून चिंचोले येथील पांजरपोळ संस्थेची जागा संपादित करण्यात यावी, अशी मागणी मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी विधानसभेत (Vidhansabha) केली आहे.
नाशिकमध्ये सातपूर येथील मुख्य औद्योगिक वसाहत (Satpur MIDC) असून त्यानंतर अंबड अतिरिक्त औद्योगिक वसाहत झाली आहे. मात्र शहरालगत नवीन औद्योगिक क्षेत्र व्हावे, अशी मागणी सातत्याने होत आहे.
मध्यंतरी या जागेचा प्रस्ताव आला होता. मात्र, तो मागे पडला होता आता पुन्हा या विषयाला उजाळा मिळाला आहे. औद्योगिक वसाहतीला लागून चिंचाळे शिवारात पांजरपोळ संस्थेची ८२५ एकर जागा असून ही जागा भूसंपादित केल्यास येऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांना जमीन देणे शक्य होणार आहे.
बाजारभावाप्रमाणे ही जागा भूसंपादित केल्यास पांजरपोळ ग्रामीण भागात जमीन विकत घेतली जाऊ शकते व शहरातील औद्योगिक क्षेत्राची समस्यादेखील संपुष्टात येऊ शकते, म्हणुन तत्काळ कारवाई करण्याची मागणी मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अर्थसंकल्पावर बोलताना आ. फरांदे यांनी केली आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...
नाशिक शहरात औद्योगिक क्षेत्र विकसित होत नसल्याने खंत व्यक्त होते. नाशिकचे वातावरण उद्योगासाठी पूरक असताना अनेक उद्योजकांकडून नाशिक येथे जागेची मागणी केली जाते. मात्र जागा उपलब्ध नसल्यामुळे उद्योगांमध्ये वाढ करणे शक्य होत नाही. म्हणून मी ही मागणी केली आहे.
- आ. देवयानी फरांदे.