
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अवकाळी पावसामुळे (unseasonal rain) जिल्ह्यासह शेत पिकांचे मोठे नुकसान (crop damage) झाले आहे. त्यामुळे शेतकरी (farmers) उद्ध्वस्त झाला असून,
नुकसानीचे तत्काळ पंचनामे (panchanama) करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (compensation for damages) तातडीने देण्यात यावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेने (Svarajya Sanghatna) केली आहे. तसे न केल्यास आंदोलन (agitation) छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने (unseasonal rain) मोठे नुकसान केले आहे अवकाळी पावसामुळे द्राक्ष, गहू, कांदा, हरभरा, टोमॅटो, गहू या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानीचे तात्काळ पंचनामे (panchanama) केले जावेत. व तातडीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (compensation for damages) मिळावी, अशी मागणी संघटनेचे संपर्कप्रमुख करण गायकर यांनी केली. सरकारने या नुकसानीची गांभीर्याने दखल घेतली नाही, बळीराजाच्या नुकसानीच्या वेळेला त्यांना साथ देण्यासाठी शासन पुढे आले नाही.
त्यांची तातडीने नुकसान भरपाई दिली नाही, तर स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्या मार्गदर्शनात संघटना राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात प्रदेश प्रवक्ते करण गायकर यांनी निवेदनाद्वारे (memorandum) जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.