नांदगावला मेमू रेल्वेस थांबा न दिल्यास जनआंदोलन

आ. सुहास कांदे यांचा इशारा
नांदगावला मेमू रेल्वेस थांबा न दिल्यास जनआंदोलन

नांदगाव । प्रतिनिधी

भुसावळ-पुणे दरम्यान आजपासून मेमू रेल्वे सुरू होणार असुन या गाडीला देखील नांदगाव स्थानकात थांबा न दिल्याने केद्र सरकारच्या व रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आ. सुहास कांदे यांनी दिला आहे.

मध्य रेल्वे भुसावळ विभागामार्फत भुसावळ ते पुणे दरम्यान मेमू रेल्वे सुरू करण्यात येणार असून गुरुवार पासूनच ही गाडी चालवण्यात येणार आहे. संपूर्णपणे आरक्षित असणार्‍या या गाडीला देखील नांदगाव येथे थांबा देण्यात आलेला नसल्यामुळे रेल्वेने पुन्हा नांदगाव तालुक्यातील जनतेची मोठी गैरसोय निर्माण होणार आहे.

रेल्वे थांब्याकरीता केद्र सरकार अखत्यारीत प्रश्न आहे. खा. भारती पवार यांनी लक्ष घालून थांबा पुर्ववत करावा अन्यथा केद्र सरकार व रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जनतेच्या मागणीसाठी जन आंदोलन छेडण्याचा इशारा आ. कांदे यांनी दिला आहे.

दरम्यान, नांदगाव स्थानकात थांबत असलेल्या कामायनी, महानगरी, झेलम, काशी, एक्स्प्रेस आदी गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले असून यामुळे येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com