कठोर परिश्रमाला जिद्द व चिकाटी ची जोड दिली तर यश नक्कीच

विधानसभेचे हंगामी अध्यक्ष ना. नरहरि झिरवाळ
कठोर परिश्रमाला जिद्द व चिकाटी ची जोड दिली तर यश नक्कीच

सुरगाणा | प्रतिनिधी Surgana

कधी दुष्काळ हा सुकाळ असतो. गरीबीतून पुढे न्यायला आपल्याला कारणीभूत ठरु शकतो.कठोर परिश्रमाला Hard work जिद्द व चिकाटी ची जोड दिली तर सुरगाणा तालुक्यात Surgana Taluka खेळाडूंची खाण होऊ शकतो असे प्रतिपादन विधानसभेचे हंगामी अध्यक्ष ना. नरहरि झिरवाळ यांनी केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक,तालुका क्रीडा संकुल व सेवा सागर क्रीडा कला व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित 'बिरसा मुंडा मॅरेथॉन स्पर्धा' , 'फिट इंडिया फ्रिडम रन २.०' , 'आजादी का अमृत महोत्सव' आयोजित करण्यात आला होता .

यावेळी व्यासपीठावर मांऊट एव्हरेस्ट शिखर सर वीर हेमलता गायकवाड, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू संजिवनी जाधव,दुर्गेश महाले, आमदार नितीन पवार, उपजिल्हाधिकारी डॉ. प्रकाश थविल, एन.डी. गावित, मोहन गांगुर्डे, चिंतामण गावित, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, प्राचार्य डॉ. प्रतापराव दिघावकर, आदिवासी बचाव अभियान सामाजिक कार्यकर्त्या सरोजताई भोये, रंजित गावित, रमेश थोरात, क्रीडा अधिकारी महेश पाटील, संदीप,राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार जिवा पांडू गावित, पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झिरवाळ म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. कठोर मेहनत व सातत्य ठेवले तर यश हमखास मिळते.

या स्पर्धा ४ गटात घेण्यात आल्या

यामध्ये १२ वर्ष मुले,मुली १५ वर्षे,१८ वर्षे, खुला गट असे गट निहाय आयोजन करण्यात आले. यशस्वी विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आली. त्यामध्ये रोख रक्कम, प्रमाण पत्र, ट्रॉफी, शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सदर मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्रातील पाचशे पेक्षा जास्त खेळाडू मुलांनी सहभाग नोंदविला स्पर्धा विजेते खेळाडू नाव पुढील प्रमाणे

१२ वर्ष मुली आठशे मीटर- .ललिता चोधरी,श्रेया जाधव,सायली गोमल,देवकी गायकवाड,

12 वर्ष मुले एक किलो मीटर करीता.- करण गावित,तन्मय लोखंडे, सतीश पल्लवी,प्रभात पाडवी,

१५ वर्ष मुली दोन किलोमीटर -सकीला वसावे,साक्षी हाडोले, धनश्री होलगे, मनीषा पवार,

१५वर्ष मुले तीन किलो मीटर- पृथ्वी राजभर,गणेश टारगे, पंकज होलगीज,प्रतीक जवळ,

१८वर्ष मुली तीन किलो मीटर - तुळशी चोरे,वेदिका मंडलिक, जयश्री राऊत,साक्षी धपाटे,

18 वर्ष मुले - आशिष जगताप,दीपक गायकवाड,रोहन पाल,आकाश लोटे,

खुला गट १० किलोमीटर- दयराम गायकवाड,रोहित यादव, दयानंद चैधरी, सुरेश झरे,

कार्यक्रमचे आयोजन सेवा सागर क्रीडा कला व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष दिनेश पागी,हिरामण शेळके धर्मेंद्र पगारीया, सेवानिवृत्त शिक्षक एन.एस चोधरी,निलेश जाधव,परशराम पाडवी,भागवत धूम,विलास पागी,अण्णा जाधव, रतन चौधरी,रामभाऊ थोरात, मोतीराम भोये,तुकाराम अलबाड यांनी केले.तर सूत्रसंचालन मोहपाडा येथील शिक्षक दीपक अहिरे यांनी केले.

Related Stories

No stories found.