जनुकीय अभियांत्रिकीला परवानगी दिल्यास 14 कोटी तरुणांना रोजगार

जनुकीय अभियांत्रिकीला परवानगी दिल्यास 14 कोटी तरुणांना रोजगार
देशदूत न्यूज अपडेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्र शासनाने (Central Government) जनुकीय अभियांत्रिकीला (Genetic engineering) परवानगी दिल्यास देशात 14 कोटी तरुणांना रोजगार (Employment) प्राप्त होईल, असे प्रतिपादन शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे (Lalit Bahale) यांनी केले...

सिद्धपिंप्री येथे शेतकरी संघटना आणि ग्रामपंचायतीच्यावतीने ’रूप पालटू शिक्षणाचे’ या विषयावर बहाळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. आमदार अ‍ॅड. राहुल ढिकले अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर सरपंच मधुकर ढिकले, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुनतात्या बोराडे, कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले उपस्थित होते.

बहाळे म्हणाले की, हल्ली विद्यार्थ्यांवर फक्त अभ्यासाचा मारा केला जात आहे. परंतु,त्यांना प्रत्यक्ष जीवनात आवश्यक असलेल्या अर्थार्जनाचे शिक्षण देण्यास कमी पडत आहे.त्यामुळे शिक्षकांनी आणि पालकांनी आठवीपासूनच विध्यार्थ्यांना लहान-मोठे व्यावसायिक शिक्षण देण्याची गरज आहे जेणेकरून कमाईतून शिक्षणाची गोडी लागल्यास त्याचा निश्चित विद्यार्थ्यांना लाभ होईल.

शिक्षण पद्धत दोन विभागात विभागली गेली असून त्यामध्ये कौशल्य ग्रहण करणे तर दुसरी संशोधन करणे कौशल्य असलेल्या शिक्षणामुळे व्यावहारिक ज्ञानात भर पडते. त्यामुळे सध्या फक्त शिक्षण घेण्यापेक्षा शिकणार्‍यांना शिकवायचे शिक्षणाची गरज असल्याचे बहाळे यांनी सांगितले.

आ. राहुल ढिकले यांनी विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच आपले आवडते क्षेत्र निवडून त्यावर लक्ष केंद्रित केल्यास निश्चित यश प्राप्त होते. जगात जी सर्वोच्च जागा आहे. ती नेहमी आपल्यासाठी रिक्त असते. फक्त त्यासाठी मेहनतीची तयारी ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. शंकरराव ढिकले यांनी प्रास्तविक करून शेतकरी संघटनेबाबत माहिती देत शेतकर्‍यांना हवे असलेले प्रश्न मांडले. यावेळी अनिल दिकले, मनोज जाधव आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com