जिल्हा बँक टिकवायची असेल तर वसुली हाच पर्याय: प्रशासक प्रतापसिंह चव्हाण

जिल्हा बँक टिकवायची असेल तर वसुली हाच पर्याय: प्रशासक प्रतापसिंह चव्हाण

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Nashik District Central Cooperative Bank) (NDCC) टिकवायची असेल तर वसुली (recovery) हाच पर्याय आहे.

त्यादृष्टीने योजना आणि धोरणे तयार केले जातील, असे बँकेचे नूतन प्रशासक प्रतापसिंह चव्हाण (Administrator Pratap Singh Chavan) यांनी पत्रकारांशि बोलताना स्पष्ट केले. बँकेच्या प्रशासक पदाची सुत्रे कदम यांच्याकडून स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.

ते म्हणाले, जिल्हा बँक (District Bank) ही शेतकऱ्यांची (farmers) हक्काची बँक आहे. तिला पुर्नवैभव प्राप्त करुन देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. बँकेचे प्रशासक अरुण पवार यांची नियुक्ती रद्द करीत राज्य शासनाने (State Govt) राज्य सहकारी बँकेचे सेवानिवृत्त सह व्यवस्थापक प्रतापसिंह चव्हाण यांची नियुक्ती केली आहे.

पदभार स्विकारताच चव्हाण यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामकाजाची माहिती घेतली. सहकार आणि कृषी क्षेत्रात (Co-operative and Agricultural Sector) नाशिकचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्या जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती खालावणे हे जिल्ह्यासाठी भुषणावाह नाही. जिल्हा बँक टिकवायची असेल तर वसुली हाच पर्याय आहे. त्यादृष्टीने योजना आणि धोरणे तयार केले जातील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील साधारणपणे 20 टक्के लोकांकडे 80 टक्के थकबाकी आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com