सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणार - अ‍ॅ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

पक्षाची दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठक नाशकात संपन्न
सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणार - अ‍ॅ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

वंचित बहुजन आघाडी ( Vanchit Bahujan Aaghadi )सत्तेत आल्यास २००५ नंतर शासकीय सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करू', असे आश्वासन राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक अंजनेरी ( Anjaneri )परिसरात संपन्न झाली त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य कार्यकारिणीच्या दोन दिवसांच्या बैठकीत संघटन बांधणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच अन्य निवडणुकांत पक्षाचे धोरण काय असेल, तसेच कुणाबरोबर युती करावी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी राजकीय मुद्यांवर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य निवडणुका कोणत्या मुद्यांवर लढवाव्यात, तिकीट वाटपासाठी कोणते निकष ठरवावे या विषयांवर मुद्देसूद चर्चा होऊन त्याबाबतचे विविध ठराव बैठकीत संमत झाले.

या बैठकीस प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण, धैर्यावर्धन पुंडकर, नागोराव पांचाळ, दिशा पिंकी शेख, सोमनाथ साळुंखे, गोविंद दळवी, अनिल जाधव, सर्वाजित बनसोडे, सिद्धार्थ मोकळे, प्रदेश प्रवक्ते फारुख अहमद, प्रियदर्शि तेलंग तसेच निमंत्रित सदस्य अशोक सोनोने, कुशल मेश्राम, विष्णु जाधव, महिला आघाडी महासचिव अरुंधती शिरसाठ आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com