बांधकामासाठी वृक्ष तोड केल्यास नवीन वृक्ष लावणे बंधनकारक

बांधकामासाठी वृक्ष तोड केल्यास नवीन वृक्ष लावणे बंधनकारक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

बांधकामासाठी वृक्ष तोड (felling of trees) केल्यास इमारतीच्या कपाऊंड अथवा मोकळ्या जागी नवीन वृक्ष लावणे (planting trees) बंधनकारक असणार आहे.

यापुर्वी वृक्ष लागवड करण्यास असमर्थ असल्याची सबब पुढे करत दीड हजार रुपये ना परतावा रक्कम महापालिकेला अदा करुन बिल्डर हात झटकून घेयचा. मात्र, उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने (Tree Authority Division) वृक्ष लागवड करणे आता बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असून यापुढे कोणतीही सबब चालणार असा इशारा देत बिल्डर लाॅबीच्या मनमानीला चाप दिला आहे.

शहराच्या विकास झपाट्याने होत असून टोलेजंग इमारती बांधण्यासाठी सरार्स झाडांची कत्तल (Slaughter of trees) केली जात आहे. बांधकामासाठी वृक्षतोड परवानगीचे अर्जाला उद्यान विभागाकडून (Department of Parks) परवानगी दिली जाते. परवानगी देताना सबंधित बिल्डरने तोडलेल्या वृक्षांच्या वया इतकी नवीन वृक्ष लागवड (Tree planting) करुन पुढिल सात वर्ष त्याचे संगोपन केले जाईल ही अट महत्वाची असते.

मात्र, अनेक बिल्डर नवीन वृक्ष लागवड करण्यास असमर्थ असल्याचे कारण देत प्रती वृक्ष लागवड व संगपोन असे दीड हजार रुपये महापालिकेकडे भरुन जबाबदारी झटकता. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी उद्यान विभागाने झाडे तोडल्यास नवीन वृक्ष लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. जागा उपलब्ध नाही असे कारण असेल तर इमारतीच्या कंपाऊंडमध्ये वृक्ष लागवड करावी लागेल.

तिथे पुरेशी जागा नसेल तर जवळील मनपाच्या मोकळ्या जागेत किंवा काॅलनी रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करावी. हा पर्याय देखील शक्य नसेल तर महापालिका हद्दित जिथे शक्य होईल तेथे वृक्ष लावावे, असे आदेशात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com