शिक्षकांकडूनच आदर्श समाज निर्मिती - रतन चावला
नाशिक

शिक्षकांकडूनच आदर्श समाज निर्मिती - रतन चावला

शिवसेना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण

Abhay Puntambekar

देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

शिक्षक हा भावी समाजाचा शिल्पकार असून बिकट परिस्थितीत देखील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करून आदर्श समाज निर्माण करत असल्यांचे प्रतिपादन शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला यांनी केले.येथील डॉ.गुजर सुभाष हायस्कूलमध्ये नाशिक जिल्हा शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिले जाणारे गुणवंत शिक्षक व शिक्षकेतर सेवक पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

यावेळी मंचावर माजी उपाध्यक्ष दिनकर पाळदे, मनपा नगरसेवक केशव पोरजे, चंद्रकांत गोडसे, संजय गोडसे, निवड समितीचे अध्यक्ष के.के.अहिरे, साहेबराव कुटे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकातून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे उपजिल्हाप्रमुख संग्राम करंजकर यांनी पुरस्कार निवडीविषयी माहिती दिली. तर निवड समितीचे अध्यक्ष के.के.अहिरे यांनी गेल्या सहा वर्षापासून नियमितपणे या पुरस्कारांचे वितरण अगदी पारखून केले जात असून शिवसेनेच्या या ८० टक्के समाजकारणाचा हेतू देखील साध्य होत भरीव कार्य घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर चैताली विश्वास- इंग्रजी माध्यम, संजय आढाव-माहिती व तंत्रज्ञान, माया अभय टिल्लू -अंगणवाडी सेविका व ज्योती चव्हाण- विशेष पुरस्कारांसह परिसरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गोरख कुणगर, सी.बी.पवार, रामदास गडकरी, के.डी.वाघ, नलिनी लोखंडे, उषा परदेशी, रंगनाथ जाधव, लक्ष्मण मुसळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रुपाली शहाणे तर आभार रघुनाथ गायकवाड यांनी मानले.

Deshdoot
www.deshdoot.com