१२ सप्टेंबरला आयसीएमआर फेलोशिप प्रवेश परीक्षा

१२ सप्टेंबरला आयसीएमआर फेलोशिप प्रवेश परीक्षा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) २०२१ साठी फेलोशिप परीक्षेची (Fellowship exam) घोषणा केली आहे. आयसीएमआर जेआरएफ-परीक्षा २०२१ चे (ICMR JRF-Exam 2021) वेळापत्रक (Schedule) जाहीर केले आहे. ही परीक्षा पीजीएमआर चंडीगडच्या (PGMR Chandigarh) सहयोगाने होणार आहे. परीक्षेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्जाची मुदत आहे...

इच्छुक व पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन (Online) अर्ज करू शकतात. आयसीएमआर जेआरएफ-२०२१ परीक्षा १२ सप्टेंबरला होणार आहे. ही कॉम्प्युटर आधारित परीक्षा देशाच्या वेगवेगळ्या केंद्रांवर होणार आहे.

या परीक्षेच्या माध्यमातून देशातील कोणतेही वैद्यकीय महाविद्यालय (Medical College), हॉस्पिटल (Hospital), विद्यापीठ (University) किंवा नॅशनल लॅबोरेटरीमध्ये (National Laboratory ) पीएचडी रिसर्चसाठी (PhD research) प्रवेश घेता येतो. परीक्षेत यशस्वी होणार्‍या दीडशे उमेदवारांना फेलोशिप दिली जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com