
पेठ | Peth
नाशिक-पेठ मार्गावर (Nashik Peth Highway) वाहनाच्या धडकेने तरसाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.बोरवठ फाटा (Borwathphata) ते कोटंबी (Kotambi) दरम्यान राष्ट्रीय महामार्ग (National highway) ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेने तरसाचा मृत्यू झाला.
दिवसांगणिक होणारी जंगलतोडमुळे वनांचा ऱ्हास व पाण्याच्या कमतरतेमुळे शिकारीसाठी व पाण्यासाठी जंगली श्वापदे थेट मानवी वस्ती , महामार्गांच्या आश्रयास येत असल्याचे प्रकार घडत आहेत....
या महामार्गावरून मार्गक्रमण करणारा २ वर्ष वयाच्या तरस अज्ञात वाहनाच्या धडकेने घटनास्थळीच मृत्युमुखी पडला.
या घटनेची खबर वन विभागास मिळाल्यानंतर नाशिक प्रभागाचे सहा. वन संरक्षक ए. जी. पवार यांनी घटनास्थळी येऊन घटनेची पाहनी करून पशु वैद्यकीय अधिकारी यांनी जागेवरच शवविच्छेदन केले.
वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. सोनवणे यांनी दिलेल्या सुचनेनुसार, वनपरिमंडळ अधिकारी युवराज गवळी, वनरक्षक जे . एम . गायकवाड यांनी मृत तरसाला ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले.