अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी तरसाचा मृत्यू
नाशिक

अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी तरसाचा मृत्यू

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

रस्ता ओलांडणाऱ्या सात वर्षाच्या मादी तरसाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आज घडली. पहाटे साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिरावणीजवळ ही घटना घडली असून वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर नेहमीच वन्यप्राण्यांचा वाहनांच्या धडकेत जखमी होण्याचे प्रमाण तसेच मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे.

आज पहाटे येथील गायत्री मठासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पश्चिमचे वनपरिक्षेत्रक अधिकारी विवेक भदाणे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अपघाताबाबत अधिक माहिती मिळू न शकल्याने अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या रस्त्यावर नेहमीच वन्यप्राण्यांचा जीव जात असल्यामुळे वनविभागाने महामार्गावर वन्यजीवांचे फोटो, त्यांची माहिती आणि वाहने हळू चालविण्याचे आवाहन करणारे फलक लावण्यासंदर्भात उपाययोजना केली पाहिजे अशी मागणी प्राणीमित्रांकडून केली जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com