करोनाग्रस्तांसाठी आता नाशकात 'हैदराबाद पॅटर्न' उपचार

करोनाग्रस्तांसाठी आता नाशकात 'हैदराबाद पॅटर्न' उपचार

जुने नाशिक l Old Nashik (प्रतिनिधी) :

करोनाग्रस्तांसाठी आता नाशकात हैदराबाद पॅटर्नची औषधे उपलब्ध झाली आहेत. ही औषधे हैदराबाद स्थित एका ग्रुपने तयार केली असून इस्लामचे पैगंबर साहेबांनी दाखविलेल्या औषधोपचार पद्धतीनुसार तयार करण्यात आल्याची माहिती मोहम्मद अकील अहमद यांनी दिली आहे.

औषध बडी दर्गा शरीफ मशिद ट्रस्टतर्फे रुग्णांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मागील वर्षी मालेगावच्या युनानी काढा उपचार पद्धतीला नागरीकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. करोनावर अतिशय गुणकारी उपचार पद्धती म्हणून मालेगाव पॅटर्नची चर्चा झाली होती. यंदा मात्रहैदराबाद पॅटर्नची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

हैदराबादचे अहमद यानी तयार केलेले औषध करोनाग्रस्त रुग्णांवर परिणामकारक ठरत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. दरम्यान अहमद यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह नुकतीच बडी दर्गा शरीफ येथे भेट देवून औषधाची माहिती दिली. तर काही प्रमाणात औषध बडी दर्गाह शरीफ मशिदीचे विश्‍वस्तांकडे सुपर्द केला.

काचेच्या सुमारे ७० मिली लिटरच्या बाटलीत ज़ैतुन तेलापासून तयार केलेले व 'तिब्बे नबवी' या नावाने हे औषध वितरित केले जात आहे. या औषधाचे कुठलेही दुष्परीणाम नसल्याचे त्यानी सांगीतले. आतापर्यंत हैदराबादसह परराज्यातील ८ लाख नागरीकानी याचा वापर केला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

रोज सकाळी उपाशी पोटी दोन चमचे त्यानंतर दहा ते १५ मिनिटानी कोमट पाणी व त्यानंतर आर्ध्या तासानंतर नाश्ता, तसेच दुपारी आणि रात्री जेवणानंतर आर्ध्या तासाने वरील पध्दतीनुसार औषध घेणेची माहिती यावेळी दिली गेली.

करोना बांधीत रुग्णाने औषध घेतल्यास केवळ तीन किंवा चार दिवसात तो बरा होतो. गेल्या वर्षभरात या औषधाचे वापराने सुमारे ९५ टक्के रुग्ण बरे झाल्याचा दावा त्यानी केला.

सामाजिक बांधीलकी म्हणून औषधाचे निर्माण करुन मोफत वितरण केले जात असल्याचे त्यांनी सांगीतले. महाराष्ट्रासह तेलंगणा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, सऊदी अरब, दुबई येथे देखील ही औषध वितरित करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी हैदराबाद येथून आलेल अब्दुलमाजीद खान, तारीक अशरफ उमरी, अकील देशमुख, रफिक सय्यद, अब्दुलमलिक चाऊस, मुस्तफा इकबाल यांच्यासह बडी दर्गाह मशिद ट्रस्टचे विश्‍वस्त हसीब पिरजादे, अन्सार पिरजादे, माजीद पिरजादे, हाजी वसीम पीरजादे, मुशीर पिरजादे, परवेज पिरजादे, खलील अहमेद, सादीक शेख, फारुख सय्यद, अरमान पीरजादे, मुबीन पीरजादे आदी उपस्थीत होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com