पत्नीचा आग्रह भोवला; मंदिरात पाळला नाग, त्याच नागाच्या दंशाने पतीचा मृत्यू...

पत्नीचा आग्रह भोवला; मंदिरात पाळला नाग, त्याच नागाच्या दंशाने पतीचा मृत्यू...
USER

दिंडोरी । प्रतिनिधी

पत्नीच्या आग्रहामुळे चक्क दोन ते अडीच वर्षे महादेव मंदिरात विषारी नाग पाळला खरा. पण, त्याच नागाने पत्नीसमोर केलेल्या दंशाने पतीला जीव गमवावा लागल्याची घटना सुरगाणा तालुक्यातील माणी- उंबरदे येथे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे....

आदिवासी भागात अंधश्रध्देतून अघोरी प्रकारातून करणी, भानामतीसारख्या दुदैवी घटना घडत आहेत.

परंतू, आदिवासी भागातील लोक वैज्ञानिक जनजागृतीपासून कोसो दूर असल्याचा प्रत्यय माणी - उंबरदे येथे आला.

माणीजवळील उंबरदे गावाच्या पुर्वेला वडाचामाळ डोंगरावर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बन्सीराम गंगाजी मिसाळ (52) या कथित बाबाने देवीची मूर्ती तसेच शंकराची पिंड असलेले शेषराव महाराजांचे मंदिर पाच ते सहा वर्षापुर्वी उभारले.

याच मंदिरात बन्सीराम मिसाळ यांची पत्नी जानकी समवेत वास्तव्यास होते. दोघांचीही मंदिरातील शंकराच्या पिंडीवर अपार श्रध्दा होती. दोन ते अडीच वर्षापुर्वी एक विषारी नाग त्या पिंडीवर बसलेला आढळून आला.

पत्नीने पाहिल्यावर साक्षात भगवान शंकरच आपल्या अलोट भक्तीवर प्रसन्न झाल्याची धारणा त्यांची झाली. पतीने नागाला मंदिराबाहेर हाकलण्याचा एक- दोन वेळा प्रयत्न केला. त्यानंतर नागाची मंदिरात पूजा सुरु झाली.

मात्र, 15 एप्रिलला मात्र ही अंधश्रद्धा कथित बाबाच्या थेट जीवावरच बेतली. पाच ते सात अंधश्रध्दाळू भक्त मंदिरात आले असता आजारी व्यक्तीला झटकायला सुरुवात केली.

भोंदुबाबाने पिंडीवरुन दुग्धाभिषेक सुरु केला असता पिंडीवरुन अलगदपणे हात फिरवला. त्याचवेळी खाली छिद्रात असलेल्या विषारी नागाने काहीतरी भक्ष्य आले म्हणून मिसाळ यांच्या डाव्या हाताच्या तर्जनीला कडाडून दंश केला.

ही घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास पत्नी व असलेल्या भक्तांसमोर घडल्याने त्यांना तत्काळ सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नाशिकला नेत असतानाच रस्त्यातच त्यांना मृत्यूने गाठले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com