
पंचवटी | प्रतिनिधी | Panchavati
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात सातत्याने हत्येच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिनाभरापूर्वी अंबड परिसरात (Ambad Area) एका युवकाची चार ते पाच युवकांनी तीक्ष्ण हत्याराने अवघ्या १० ते १२ सेकंदात २६ वार करत हत्या (Murder) केल्याची घटना घडली होती. यानंतर जुने सिडको परिसरातील शिवाजी चौक शॉपिंग सेंटर (Shivaji Chowk Shopping Center) येथे एका भाजी विक्रेत्याची अज्ञात सहा व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करत हत्या केली होती.
त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्याच्या (Gangapur Police Station) हद्दीत एका युवकाची किरकोळ वादातून दोघांनी हत्या केल्याची घटना घडली होती. शहरात या हत्येच्या घटना ताज्या असतानाचा आता पुन्हा एकदा शहरातील आडगाव परिसरामधील इच्छामणी नगरमध्ये सकाळी सात वाजेच्या सुमारास पतीने पत्नीची हत्या करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विशाल निवृत्ती घोरपडे असे आत्महत्या (Suicide) केलेल्या पतीचे नाव असून प्रिती विशाल घोरपडे असे हत्या झालेल्या पत्नीचे (wife) नाव आहे.आज सकाळी विशाल घोरपडे याने आपली पत्नी प्रिती ही गाढ झोपेत असतांना तिच्या डोक्यात मुसळी टाकत तिची हत्या केल्याचे समजते. त्यानंतर विशाल घोरपडे याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना समजताच घोरपडे कुटुंबातील सदस्य घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, विशाल घोरपडे याने आपल्या पत्नीची हत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही. या हत्येमुळे नाशिक शहरासह इच्छामणी नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे.