पेठ : पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या
नाशिक

पेठ : पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या

Gaurav Pardeshi

Gaurav Pardeshi

पेठ | Peth प्रतिनिधी

तालुक्यातील करंजाळी नजिकच्या उभीधोंड येथे विठाबाई सोमनाथ गवळी (वय ४२) हिचेवर प्राणघातक हल्ला होऊन सदरची महिला मृत झाल्याची खबर मुलगा जगन गवळी याने पोलीसाना दिली.

पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असता सदरचा प्रकार खुन झाल्याचे दिसुन येत असतांनाच मयत विठाबाई हिच्या चारीत्र्यावर पती सोमनाथ सिताराम गवळी (वय ४५) हे कायम संशय घेत असल्याने त्यांच्यात या वरुण कायम वाद होत असल्याचे तपासात आढळून आले.

तर घटने नंतर सिताराम गवळी हे बेपत्ता झाल्याने विठाबाईच्या हत्येच्या संशयाची सुई त्यांचे कडेच वळत असतांना घटने नंतर दुसरेच दिवशी सोमनाथ गवळी यांनी आपल्या उभीधोड परिसरातील शेतातील आसंदाचे झाडास कापडी दोरीने गळफास घेतल्याची खबर पोलीस पाटील निवृती गवळी यांनी पेठ पोलीसात दिल्याने सदर प्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद झाली आहे.

संशयाचे वहीमा वरुण पत्नीच्या हत्ये पाठोपाठ पतीच्या आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली असुन सपोनि संदीप वसावे यांचे मार्गदर्शनाखाली हवा. शेख अधिक तपास करीत आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com