पतीचा पत्नीवर कात्रीने हल्ला

भारतनगर परिसरातील घटना
पतीचा पत्नीवर कात्रीने हल्ला

नाशिक | Nashik

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने घरातील कात्रीने पत्नीवर हल्ल्ला (Husband Attack) करत गंभीर जखमी केल्याची घटना भारतनगर परिसरात (Bharatnagar Area) गुरूवारी (दि.1) दुपारी घडली. शेहनाज अब्दुल शेख (Shehnaj Abdul Shaikh) (23, रा. शिवाजीवाडी, भारतनगर) असे संशयिताचे नाव आहे.

पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार शेहनाज शेख हा तीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून दोघांची वारंवार भांडणे (Frequent arguing) होत होती. गुरूवारी दुपारी याच कारणातून भांडण झाले.

यामुळे रागाच्या भरात त्याने पत्नीच्या डोक्यात तसेच पायावर कात्रीने वार करून गंभीर जखमी केले.

याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात (Mumbainaka Police Thane) गुन्हा दाखल ( Case Filed) करण्यात आला आहे. संशयित शेहनाज यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्यावर यापुर्वी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे. अधिक तपास उपनिरिक्षक रभवंत करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com