क्राइम
क्राइम
नाशिक

पंचवटी परिसरात पत्नीवर वस्तर्‍याने हल्ला

कौटुंबिक वादातून घडली घटना

Khandu Jagtap

Khandu Jagtap

नाशिक| Nashik

कौटुंबिक भांडणातून पतीने पत्नीच्या गळ्यावर वस्तर्‍याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पंचवटितील समर्थनगर परिसरात गुरूवारी (दि.३०) सायंकाळी घडली.

दिपक पवार (२३, रा. समर्थनगर, मॉडर्न कॉलेज जवळ, पंचवटी) असे हल्ला करणार्‍या संशयित पतीचे नाव आहे. तर या घटनेत त्याची पत्नी पुजा पवार (२१) ही गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी योगेश तुकाराम चौधरी यांनी तक्रार दाखल केली आहे.

त्यानुसार संशयित दिपक व त्याची पत्नी पुजा यांच्यामध्ये घरगुती कारणातून वाद झाले याच्या रागातून दिपक याने तीच्या गळ्यावर वस्तर्‍याने वार करून तीला गंभीर जखमी केले. तीच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक एस.सी. कासर्ले करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com