Nashik Road : रेल्वेखाली उडी घेत पती-पत्नीची आत्महत्या

Nashik Road : रेल्वेखाली उडी घेत पती-पत्नीची आत्महत्या
Sandip Tirthpurikar

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

देवळाली कॅम्प (Deolali Camp) येथील मध्य रेल्वेच्या हद्दीतील रेल्वेखाली पती-पत्नीने (Husband and Wife) उडी घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी नाशिकरोड रेल्वे पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची (Death) नोंद करण्यात आली आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) भरवीर येथील निवृत्ती किसन खातळे(४९) आणि त्यांची पत्नी मंजुळा निवृत्ती खातळे(४०) हे रविवार (दि. २८) रोजी दुपारी देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक (Deolali Camp Railway Station) परिसरात आले होते.

Nashik Road : रेल्वेखाली उडी घेत पती-पत्नीची आत्महत्या
धनंजय मुंडेंकडे नाशिकची जबाबदारी? भुजबळ स्पष्टच बोलले...

त्यानंतर त्यांनी रेल्वे मार्गावरील पोल क्रमांक 180/01 आणि पोल क्रमांक 180/03 यादरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास गोदान एक्सप्रेस (Godan Express) खाली आत्महत्या केली. तसेच घरगुती कारणामुळे या दोघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

Nashik Road : रेल्वेखाली उडी घेत पती-पत्नीची आत्महत्या
Road Accident : भीषण अपघातात ७ इंजिनियर विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जखमी

दरम्यान, याप्रकरणी नाशिकरोड रेल्वे पोलिस स्थानकात (Nashik Road Railway Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप भालेराव आणि शैलेश पाटील पुढील तपास करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com