
निफाड | प्रतिनिधी | Niphad
नगरपालिकेने (Municipality) पाणीपट्टी व व्यावसायिक दरवाढ (Water Tariff and Commercial Rate Hike) मागे न घेतल्याने नागरिक बचाव कृती समितीने गुरुवारी (दि. १७) निफाड (Niphad) बंदची हाक दिली...
दरवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी नगरपालिकेसमोर उपोषणाला (Hunger Strike) बसलेल्या कृती समितीशी मुख्याधिकारी अमोल चौधरी यांनी चर्चा केली. मात्र, त्यात तोडगा न निघाल्याने तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच होते. उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी असंख्य नागरिक (Citizens) उपस्थित होते.
दरम्यान, नगरपालिकेने गावाच्या हितासाठी दरवाढ मागे घ्यावी. दहा वर्षांपासून करवाढ केली नाही. आताच इतक्या मोठ्या प्रमाणात करवाढ (Tax Hike) का. खर्च येतो मान्य आहे. पण, अवाढव्य करवाढ कुठल्या नियमात बसते, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.