कैची बंद पडली तर आम्ही जगायचं कसं?

नाशकातील सलून व्यावसायिकांचा सवाल
कैची बंद पडली तर आम्ही जगायचं कसं?

नाशिक । Nashik

करोना संसर्गाला अटकाव घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवार व रविवार अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका सलून दुकानदारांना बसत आहे.

रविवारी दुकाने उघडे ठेवण्याची परवानगी दयावी, अशी सलून व्यावसायिक संघटनेची मागणी आहे. रविवारी दुकाने बंद ठेवल्यास उपासमारीची वेळ येईल अशी भिती सलून व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

राज्यभरात करोना सुसाट असून नाशिक शहरासह जिल्ह्यात करोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यास अटकाव घालण्यासाठी सोमवार ते शुक्रवार अत्यावशक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व दुकाने सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत खुली राहतील असे आदेश देण्यात आले आहे. तर शनिवार व रविवार हे दोन दिवस अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत.

या निर्णयाचा सर्वाधिक फटका सलून व ब्युटी पार्लर दुकानदारांना बसणार आहे.रविवार कटिंग व दाढि करण्यासाठी सर्व दुकाने हाऊसफुल असतात. सर्वाधिल व्यवसाय याच दिवशी होतो. मात्र सलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश अाहेत. अगोदरच मागील वर्षी लाॅकडाउनमुळे सहा ते सात महिने सलून दुकाने बंद होते.

आता परत दुकाने बंद ठेवण्याच्या आदेशामुळे आताशी कुठे स्थिरस्थावर झालेल्या सलून दुकानदारांसमोर पुन्हा उपासमारीचे संकट उभे ठाकले आहेत. शहरात जवळपास पाच हजारांहून अधिल सलून दुकाने आहेत. सोशल डिस्टन्स, मास्क घालणे, सॅनिटायझर आदी करोना नियमाचे पालन सलून दुकानदार करत आहे. त्यामुळे रविवारि सलून दुकान सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी सलून दुकानदार संघटनेने केली आहे.

सलून दुकानदारांचा सर्वाधिक व्यवसाय रविवारी होतो. पण शनिवार व रविवार दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे सलून दुकानदारांना मोठे नूकसान सोसावे लागणार आहे. जिल्हाप्रशासनाने रविवारी दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी.

- अनिल परदेशी, सलून दुकानदार

सलून संघटनेचे पदाधिकार्‍यांनी भेटुन रविवारी दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दयावी अशी मागणी केली आहे. मात्र करोना संसर्गाचा फैलाव बघता सध्या तरी परवानगी नाकारण्यात आली आहे.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com