बापरे ! मनपाच्या शेकडो शिक्षकांची लसीकडे पाठ

बापरे ! मनपाच्या शेकडो शिक्षकांची लसीकडे पाठ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शाळा महाविद्यालये (Schools & Colleges) पूर्ववत करण्यासाठी शिक्षण विभागाकडून (Department of Education) ५ सप्टेंबरपर्यंत लसीकरणाची (vaccination) सक्ती केल्यानंतरही नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) ५९८ शिक्षकांनी (Teachers) अद्याप लसीचा एकही डोस न घेतल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे यात शिक्षकेतर २२० कर्मचाऱ्यांचा (non-teaching staff) समावेश असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

करोनामुळे (Corona) शाळा महाविद्यालये अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. परंतु अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणात (online education) येणारे अडथळे आणि प्रात्यक्षिक शिक्षणाचा अभाव यामुळे शाळा सूरु करण्याची मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे १०० टक्के लसीकरण करणे सक्तीचे करण्यात आले होते.

शाळा सुरू करण्याच्या महत्वपूर्ण नियमानुसार नाशिक महानगपालिकेतर्फे १ ली ते बारावी पर्यंतच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा आढावा घेतला. त्यानुसार, ८ हजार ३०६ शिक्षक व १ हजार ९७१ शिक्षकेत्तर अशा एकूण १०२७५ कर्मचाऱ्यांपैकी ४हजार ५८९ शिक्षक व ८२० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविड लसीचे दोन्हीं डोस घेतले आहेत. तर ३ हजार १८२ शिक्षकांनी व ९४० शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी लसीचा एक डोस पूर्ण केला आहे.

याव्यतिरिक्त ५९८ शिक्षक आणि २२० शिक्षकेत्तर कर्मचारी अशा एकूण ८१८ जणांनी करोणा लसीचा आद्याप एकही डोस घेतलेला नसल्याचे समोर आले आहे. डोस न घेतलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर आपले लसीकरण करून घेण्याच्या सूचना मनपा शिक्षणाधिकारी सुनीता धनगर (Municipal Education Officer Sunita Dhangar) यांनी केले आहे

सर्व शिक्षकांचे लसीकरण करून घेण्याची जबाबदारी त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आली होती. त्या नुसार अजुनही ज्या शिक्षकांनी लसीचा एक ही डोस घेतलेला नाही अशांना पडताळणी करून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. त्याशिवाय जे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी लस घेण्यास तयार नसतील अशांनी वैद्यकीय मंडळातून ते लस न घेताही कॅम्प करु शकतात याआशयाचे फिटनेस प्रमाणपत्र मिळवावे.

- सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी, महापालिका

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com