
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad
बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे (शिंदे गट) ( Balasahebanchi Shivsena )नाशिकरोड येथे निर्वाचित सहसंपर्कप्रमुख व जिल्हाप्रमुख यांचा सत्कार तसेच सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचा शिंदे गटामध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला.
सुनील महरोलिया, सचिन ढाकणे, स्वप्निल कातोरे, सुयश पागेरे, भूषण जोरवर, विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली, जेलरोड, देवळालीगाव, एकलहरे, पंचवटी, इंदिरानगर, अंबड, सिन्नर आदी भागातील सुमारे शंभर कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला.
खा. हेमंत गोडसे, सह संपर्कप्रमुख राजु लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, अनिल ढिकले, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, युवा सेना अध्यक्ष योगेश मस्के, विक्रम कदम, अॅड. विजय कातोरे, माजी नगरसेविका वैशाली दाणी, जयश्री खर्जुल, ज्योती खोले, रमेश धोंगडे, महिला अध्यक्ष लक्ष्मी ताठे, अस्मिता देशमाने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खा. गोडसे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांचे विचार, त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम संवदेनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रामाणिकपणे करत आहेत. त्यांच्या विकास कामामुळे जनता प्रभावित झाली आहे. नाशिकच्या विकासाचा संकल्प शिंदे यांनी सोडला आहे. ज्या उद्देशाने मुख्यमंत्री शिंदे यांनी भूमिका घेतली त्याला सर्वांनी साथ द्यावी. जनतेचा विश्वास, अपेक्षा पूर्ण करण्यास आम्ही कटीबध्द आहोत. पक्षात प्रवेश केलेल्यांच्या पाठीशी आम्ही सदैव पाठीशी राहू.
भूषण जोरवर, सचिन ढाकणे, नंदू पांडे, ज्ञानेश्वर तुंगार, सुयश पागेरे, स्वप्निल कातोरे, राजाभाऊ खराटे, कृष्णाजी ताजनपुरे, सागर शेजवळ, गजानन धात्रक, भैय्या देवरे, भूषण जोरवर, ज्ञानेश्वर तुंगार, सुयश पागेरे आदींनी संयोजन केले. उद्योजक किरण वाकचौरे, ओंकार चव्हाण, केशव पोरजे, प्रतिक कदम, नितीन एखंडे, सुरज डंबाळे, हर्षल ठाकूर, आदित्य शहाणे, संदीप निंबाळकर, स्वप्निल शिंदे, शरद कोहकडे, सुयोग कोठारी, भूषण धोंडगे, जीवन लहामगे, प्रसाद बुवा, आकाश धोत्रे, सुमन बिडलानी, अनिकेत रगडे, प्रविण जाधव, राहुल शिंदे, राहुल गोरडे आदींनी पक्षप्रवेश केला.