
नाशिक | Nashik
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेतील ११ माजी नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केल्याने नाशकात ठाकरे गटाला (Thackeray Group) मोठे खिंडार पडले होते. त्यानंतर आज शेकडो समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश करत आपले समर्थन जाहीर केले...
शहारातील शिंदे गटाच्या पक्ष कार्यालयासमोर दुपारी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) माजी उपमहापौर अजय बोरस्ते (Ajay Boraste) माजी नगरसेविका सुवर्णा मटाले, अण्णा लवटे व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
यावेळी गोडसेंनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यावर तिखट शब्दात हल्ला चढवत निशाणा साधला. ते म्हणाले की, एक मच्छर माणसाचे काय करू शकतो हे राऊतांना आता समजले असेल.अनेक आजारांचे कारणीभूत ठरणारा मच्छर आता पक्षासाठी किती जागृत ठरेल याचा विचार त्यांनी करावा अशी सूचनाही गोडसेंनी केली.
तर अजय बोरस्ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलेल्या आश्वासनाची व नाशिकमध्ये सुरू केलेल्या विकासासाठीच्या पावलांची जाणीव लक्षात घेत शिंदे गटात पक्षप्रवेश केल्याचे सांगून शहराचा विकास व मुख्यमंत्र्यांचा शब्द हाच प्रमाण असल्याचे म्हटले आहे.
तसेच माजी नगरसेविका सुवर्णा मटाले (Suvarna Matale) यांनी प्रवेशानंतर परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला असल्याचे सांगून शहराबद्दल जाणीव ठेवणारे व शहराच्या विकासासाठी धडपडणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे स्पष्ट केले.