शिवजन्मोत्सवासाठी नाशिकमधून शेकडो कार्यकर्ते जाणार रायगडावर: अमित जाधव

शिवजन्मोत्सवासाठी नाशिकमधून शेकडो कार्यकर्ते जाणार रायगडावर: अमित जाधव

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शिवजन्मोत्सवासाठी (Shiv Janmatsavam) शनिवारी (दि.३) नाशिकमधून (nashik) शेकडो कार्यकर्ते रायगडावरती (Raigad) जाणार आहेत, अशी माहिती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित जाधव यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. तंजावर पासून ते अफगाणिस्तानपर्यंत (Afghanistan) स्वराज्याचा विस्तार केला. त्याचबरोबर समाजामध्ये सर्वधर्मसमभावाची भावना रुजवली. तोच विचार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले (Chhatrapati Udayanraje Bhosale) पुढे नेत आहेत. परंतु, गेल्या काही वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता वापरून त्यांच्या नावावर राजकारण केले जात आहे.

काही व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्य (Controversial statement) करून सामाजिक सालोका बिघडवला जात आहे. ही बाब आपल्या देशाच्या अस्मितेसाठी अतिशय दुर्दैवी आहे. त्यातच नवीन भर म्हणून की काय? महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (BJP National Spokesperson Sudhanshu Trivedi) यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी निषेधार्य वक्तव्य केले आहे.

राज्यपाल कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तर केलाच. परंतु,यापूर्वीही राज्यपालांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य केले होते. एकंदरीत महापुरुषांचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असे म्हणायला हरकत नाही. याचाच निषेध म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी २८ तारखेला पुणे येथे

अनेक संघटनांसोबत चर्चा करून दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे शिवसन्मानाचा निर्धार करण्यासाठी व पुढील दिशा ठरवण्यासाठी सर्वाना आवाहन करत एकत्र येण्याचे ठरविले आहे. त्यासाठी नाशिकमधूनही अनेक कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने किल्ले रायगड येथे जाणार आहे, अशी माहिती श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित जाधव यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com