शंभर रुपयांचा धनादेश लाजीरवाणे: थोरात

बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात

संगमनेर । प्रतिनिधी | Sangamner

शेतकर्‍यांच्या (farmers) शेतमालाचे नुकसान (crop damage) झाल्यानंतर त्याला योग्य ती नुकसान भरपाई (compensation for damages) मिळाली पाहिजे.

सरकारच्या वतीने व पीकविमा कंपन्यांकडूनही (Crop Insurance Companies) नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. परंतु, पीकवीमा कंपन्यांकडून शेतकर्‍यांना100 रुपयांचे धनादेश मिळाले आहेत हे अत्यंत लाजीरवाणे आहे.

पीकविमा कंपन्या नफेखोर झाल्या असून विमा कंपन्या (Insurance companies) व राज्य सरकारकडून (state government) ज्या शेतकर्‍याचे नुकसान झाले. त्याला तातडीने मदत मिळेल हे सूत्र सरकार ठेवणार का ? असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात (Congress Legislature Party Leader MLA Balasaheb Thorat) यांनी विचारला. शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईसंदर्भात बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी बुधवारी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला.

अतिवृष्टीने (heavy rain) यावर्षी शेतकर्‍यांचे फार मोठे नुकसान झाले ही वस्तुस्थिती आहे. ज्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. पीकविमा कंपन्यांकडून व राज्य सरकारकडूनही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. पण 100 रुपयांचा धानदेश पीक विमा कंपन्यांनी शेतकर्‍याला दिला ही लाजीरवाणी बाब आहे. विमा कंपन्या नफेखोर झाल्या आहेत.

आमचे सरकार असताना आम्हीही त्यासंदर्भात प्रयत्न केला. कृषिमंत्री म्हणतात एक हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचा धनादेश येणार नाही पण एक हजार हे काय शेतकर्‍याच्या मालाचे मोल आहे का? एनडीआरएफचे निकष वाढले असल्याचे सरकारने सांगितले तसे असेल तर चांगलेच आहे. संकटात शेतकर्‍याच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे राहणार का? आणि शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सरकारचे काय सुत्र आहे ? असा प्रश्न थोरात यांनी विचारला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com