आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद

आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद

लासलगाव। वार्ताहर | Lasalgaon

डॉ. बाबुराव फकिरराव पवार मेमोरीयल (Dr. Baburao Fakir Rao Pawar Memorial) व पवार अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटल (Pawar Accident Hospital) लासलगाव (lasalgaon) येथे मोफत बीएमडी कॅम्प (Free BMD Camp), युरीक अ‍ॅसिड न्युरोपॅथी कॅम्प (Uric Acid Neuropathy Camp) तसेच रक्तदान शिबिराचे (Blood donation camp) आयोजन करण्यात आले होते.

तीन दिवस असलेल्या शिबिरात 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली. पवार अ‍ॅक्सिडेंट हॉस्पिटल लासलगावमध्ये अत्याधुनिक मशिनद्वारे शरीरातील हाडे ठिसुळपणा (Brittle bones), ब्लॉक असलेल्या नसाचे परिक्षण पाठ, मान व कंबरदुखी (back pain), हातात व पायात येणार्‍या मुंग्या, पाठीत चमक,

मणक्यांचे फ्रॅक्चर, जन्मताच असलेले मणक्याचे विकार, चक्कर येणे, चालतांना तोल जाणे, मणक्याचा टीबी इन्फेक्शन/कॅन्सर आदी पेन ब्लॉक इंजेक्शन मिस सर्जर की होल (दुर्बिणद्वारे) शस्त्रक्रिया (Surgery), डिक्स रिप्लेसमेंट (Dix Replacement) मणक्याचे कुबड शस्त्रक्रिया याविषयी अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.प्रताप बा. पवार व जनरल फिजिशियन डॉ.पवार (General Physician Dr. Pawar) यांनी माहिती दिली.

बीएमडी टेस्ट म्हणजे काय?

पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी बीएमडी चाचणी करणे आवश्यक आहे. पण ज्या लोकांच्या हाडांमध्ये अनेकदा वेदना होतात. थकवा आणि अशक्तपणा लवकर जाणवतो अशा लोकांनीही ही चाचणी करून घ्यावी. हाडांची ताकद तपासण्यासाठी बोन मिनरल डेंसिटी (बी.एम.डी) चाचणी केली जाते.

या चाचणीद्वारे ड्युअल एनर्जी क्ष-किरण शोषक (डी.ई.एक्स.ए) मशीनच्या मदतीने हाडांची घनता तपासली जाते. यासोबतच हाडांच्या कमकुवतपणाचे कारण शोधले जाते. या चाचणीद्वारे हाडांमधील कॅल्शियम आणि इतर खनिजांची माहिती मिळते. या चाचणीद्वारे ऑस्टियोपेनिया आणि ऑस्टिओपोरोसिस यासारखे हाडे कमकुवत करणारे आजारही शोधता येत असल्याची माहिती देण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com