मालेगाव । प्रतिनिधी

मालेगाव तालुक्यातील रस्त्यांच्या विकासासाठी एकूण 43 कोटींच्या कामांना भरीव निधी सन 2021-22 या अर्थसंकल्पीय वर्षासाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली.

मालेगाव-सटाणा रस्ता जास्त रहदारीचा असल्याचे तसेच अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने सदर रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यास यश येऊन सदर रस्त्याचे तालुक्याच्या हद्दीपर्यंत टप्प्या टप्प्याने काँक्रिटीकरण होणार असून पहिल्या टप्प्यात मालेगाव ते दाभाडीपर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणास मंजुरी मिळाली असल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले.

राज्यविधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन पुलांसह तालुक्यातील रस्त्यांची कामे मंजूर झाली असल्याचे भुसे यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील मालेगाव-सटाणा रस्ता अंदाजित किंमत 10 कोटी, सटाणा-अजमेर सौंदाणे-रावळगाव-अजंग-झोडगे रस्ताचे रुंदीकरण करणे. अंदाजित किंमत 7 कोटी, महामार्ग ते टेहरे सोयगाव अरुणोदय कॉलनी रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे अंदाजित किंमत 8 कोटी, रावळगाव, वडनेर, गारेगाव, पोहाणे, रामपुरा रस्त्यांची सुधारणा अंदाजित किंमत 2 कोटी, महामार्ग ते लोणवाडे दसाणे मालेगाव कॅम्प,

सोयगाव टेहरे ते महामार्ग ते कौळाणे जोडणारा रस्त्याची सुधारणा करणे, लोणवाडे ते कुसुंबा रोड. अंदाजित किंमत 4 कोटी, महामार्ग ते दसाणे खडकी रस्त्याची सुधारणा करणे. कौळाणे ते घाणेगाव. अंदाजित किंमत 3 कोटी, राष्ट्रीय महामार्गपासून दसाने-खडकी-टोकडे-अस्ताने-कौळाणे-घाणेगाव-डोंगराळे नागझरी ते जिल्हा हद्द रस्त्यामध्ये पुलाचे बांधकाम करणे.

अंदाजित किंमत 3 कोटी, दाभाडी साखर कारखाना काष्टी-सुभाषवाडी-कंक्राळे रस्ता (भाग बी-सेक्शन ते काष्टी) रस्त्यांची सुधारणा करणे. अंदाजित किंमत 2.50 कोटी, महामार्ग ते दसाणे-खडकी- दहिकुटे-माणके-चिखलओहोळ- साजवहाळ- दहिवाळमध्ये पुलाचे बांधकाम करणे अंदाजित किंमत 3.45 कोटी आदी विकासकामांसाठी निधीस मंजुरी मिळाली असल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले.