वडाळा : प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग

वडाळा : प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग

जुने नाशिक l Old Nashik (प्रतिनिधी)-

अत्यंत दाट वस्ती असलेल्या वडाळा गाव प्रभाग क्रमांक 30 मधील साठेनगर भागात असलेल्या भंगार प्लास्टिकच्या गोदामाला पावणे दहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली आहे.

आगीने रुद्र रूप धारण करून पाच-सहा गोदामाला आपल्या विळख्यात घेतले आहे. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. स्थानिक तरुणांच्या मदतीने आग बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते. एक तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आल्याचे समजते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com