Nashik Fire News : आयटीआय सिग्नलजवळ इमारतीमध्ये भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

Nashik Fire News : आयटीआय सिग्नलजवळ   इमारतीमध्ये भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

येथील सातपूर (Satpur) आयटीआय सिग्नलजवळ (ITI Signal) असलेल्या गिते स्क्वेअर या इमारतीमधील (Building) एका कार्यालयाला आज पहाटेच्या सुमारास अचानक आग (Fire) लागली. या आगीने क्षणार्धात रौद्ररुप धारण केल्याने लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले...

Nashik Fire News : आयटीआय सिग्नलजवळ   इमारतीमध्ये भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक
Nashik Crime News : विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात चोरी; एक जण ताब्यात

याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर आयटीआय लगत असलेल्या गिते स्क्वेअर (Gite Square) या इमारतीत मोठ्या प्रमाणात कार्यालये आहेत. इलेक्ट्रॉनिक वापरांच्या वस्तू या कार्यालयांमध्ये (Offices) मोठ्या प्रमाणात आहेत. या इमारतीमधील आयटी क्षेत्राशी सलग्न असलेल्या एका कार्यालयाला आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. यावेळी आगीचे स्वरुप भयाण असल्याने अग्निशमन पथकाने (Fire Brigade) सातपूर,नवीन नाशिक, पंचवटी व मुख्यालयातील मेगा ब्राऊजर, सर्व फायर टेंडर बोलावले. त्यानंतर शर्थीच्या प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात आली.

Nashik Fire News : आयटीआय सिग्नलजवळ   इमारतीमध्ये भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 'या' अभिनेत्यावर खास जबाबदारी; 'नॅशनल आयकॉन' म्हणून करणार नियुक्ती

दरम्यान, या आगीत इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे (Electronic Materials) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोलाचे योगदान दिले. तसेच आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसानीचा आकडा समजू शकलेला नाही. तसेच आगीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Fire News : आयटीआय सिग्नलजवळ   इमारतीमध्ये भीषण आग; लाखोंचे साहित्य जळून खाक
Maratha Reservation : मंत्री गिरीश महाजनांचा मनोज जरांगे पाटलांना फोन; म्हणाले, उपोषण...
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com