वडाळा गावालगतच्या भंगार गोदामांना भीषण आग

आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू
वडाळा गावालगतच्या भंगार गोदामांना भीषण आग

इंदिरानगर | Indiranagar

वडाळा गावालगत असणाऱ्या महबूबनगर परिसरातील प्लास्टिकच्या भंगार गोदामांना  रात्री नऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.

आग विझवण्यासाठी घटनास्थळी नवीन नाशिक, सातपूर, पंचवटी, नाशिक रोड येथील प्रत्येकी एक बंब दाखल झाला असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. उंचच उंच आगी चे लोळ उठत असल्याने जवळ जाण्यास अडथळा येत आहे. त्यात बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने आणि या भागात अरुंद गल्ली असल्याने आग विझवण्यासाठी अडचणी येत आहेत.

इरफान शेख आणि सलीम हाजी यांच्या मालकीची हे गोडाऊन असल्याचे समजते. मोठ्या प्रमाणात फायबरचे भंगार येथे साठवल्या जाते अशी माहिती स्थानिकांनी तर्फे मिळत आहे. दरम्यान गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इंदिरानगर पोलिस देखील घटनास्थळी हजर झाले आहेत.

या ठिकाणी पंचविस ते तीस लहान मोठी अनधिकृत गोदामे आहेत. त्यामुळे ही आग सर्वत्र पसरलेली की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या परिसरात असणाऱ्या गोदामांना या प्रकारे आग लागण्याचे नेहमीच प्रकार होतात.

मात्र प्रशासनातर्फे या ठिकाणचे ना ऑडिट होते ना तपासणी होते, त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे नागरिक सांगतात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com