
सप्तश्रुंगीगड | वार्ताहर | Saptashrungi Gad
सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासूनच गर्दी होत आहे. उद्या दि. २१ ऑक्टोबरला नवरात्रोत्सवाची सातवी माळ असल्याने पुढील तीन दिवस सप्तशृंगीगडावर मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गडावर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नवरात्रोत्सवात कायदा आणि सुव्यवस्थेचे भान राखून येणाऱ्या भाविक भक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी आज येथे केले...
नवरात्रोत्सवात गडावर येणाऱ्या भाविक भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशास पूर्णपणे सज्ज झाली असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक कांगणे यांनी सांगितले. यावेळी येणाऱ्या महिला आणि वृद्ध भाविकांची गैरसोय होणार नाही. यासाठी विशेष नियोजन ट्रस्ट आणि रोपवे प्रशासनाने करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या आहेत. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी बांबळे, कळवण पोलीस निरीक्षक खेगेंद्र टेंभेकर, पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, पोलीस कर्मचारी सचिन राऊत, वर्षा निकम (राऊत) उपस्थित होते.
पोलीस कर्मचारी व होमगार्डचे जवानदेखील महत्त्वाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
- माधुरी कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.