Photo Gallery : सटाण्यात कांदा विक्रीसाठी शेकडो वाहने दाखल; शहरातही मोठी गर्दी

Photo Gallery : सटाण्यात कांदा विक्रीसाठी शेकडो वाहने दाखल; शहरातही मोठी गर्दी

नाशिक | प्रतिनिधी

आज नाशिक जिल्ह्यातील लॉकडाऊन काहीसे शिथिल करण्यात आले आहे. यामध्ये नव्या नियमानुसार शासनाने आखून दिलेले आधीचेच निर्बंध १ जून २०२१ पर्यंत कायम राहणार आहेत. तर बाजारसमिती आणि उद्योगधंदे पूर्णपणे नियामचे पालन करत सुरु ठेवण्याचे परवानगी देण्यात आली आहे.

सर्व फोटो : दीपक सूर्यवंशी, सटाणा

यापार्श्वभूमीवर आज सटाणा शहरात सकाळपासून गजबज दिसून आली आहे. तर दुसरीकडे बाजार समिती आवारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला आहे. मे अखेरीस शेतीच्या लगबग लागत असते. यावेळी शेतकरी खरिपाच्या तयारीसाठी खत खाद्य शेतात टाकणे, जमिनीची मशागत करून ठेवणे अशा कामांनी वेग घेतलेला असतो.

या कामांसाठी भांडवलाची कमतरता भासू नये यासाठी कांदयासह तत्सम वस्तूंची विक्री करून भांडवलाची कमतरता भरून काढण्याचे काम शेतकरी करत असतो. गेली दहा दिवस बंद असलेल्या बाजार समित्या आज पुन्हा एकदा सुरु झाल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी मोठी गर्दी केलेली दिसून आली.

कडक लॉकडाऊन असल्याने अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले परंतु आजपासून काही अंशी का होईना लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे सकाळपासून पंचक्रोशीतील नागरिकांनी शहरात खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

टिळक रोड, शिवाजी रोड, मुख्य बाजारपेठ परिसर, भाजीपाला मार्केट, शिवतीर्थ, चारफाटा परिसरात मोठी गर्दी दिसून आली. तसेच शहराच्या मध्यवर्ती असलेल्या मस्जिद, मल्हार रोड परिसरातही मोठी गर्दी याप्रसंगी दिसून आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com