Photo Gallery : नाशकात सकाळी तोबा गर्दी; दिवसभर शुकशुकाट, कसा रोखणार करोना?

Photo Gallery : नाशकात सकाळी तोबा गर्दी; दिवसभर शुकशुकाट, कसा रोखणार करोना?
सतीश देवगिरे Nsk

नाशिक | प्रतिनिधी

करोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्यासह नाशकात कडक लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, सकाळी अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडण्यास मुभा देण्यात आली आहे....

(सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे)

यामुळे मोठ्या प्रमाणात नाशिककर रविवार कारंजा, अशोकस्तंभ, रेड क्रॉस सिग्नल, मेन रोड, सराफ बाजार परिसरात गर्दी करताना दिसून येत आहेत. सकाळी अचानक मार्केटमध्ये होणारी गर्दी यामुळे पुन्हा एकदा करोना वाढीचा आकडा नाशिकमध्ये वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रविवार कारंजा परिसरातील किरणां दुकानांमध्ये मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी वेडीवाकडी वाहने रस्त्यावर उभी केली. दुसरीकडे किरणा माल पोहोचविण्यास आलेल्या इतर मालवाहतूक गाड्यांची यामध्ये भर पडली. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

वाहतूक पोलीस कोंडी फोडण्याचा पर्यंत करत होते मात्र, नागरिकांच्या दुचाक्या, रिक्षा, यामुळे मोठ्या संख्येने एकामागे एक गाडया उभ्या राहिल्याने रविवार कारंजा पासून मालेगाव स्टडपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

अकरा नंतर पोलीस सक्रीय

लॉकडाऊनचे नियम काटेकोर पाळले जावेत यासाठी नाशिक पोलीस सक्रीय आहेत. मात्र, अकरा वाजेनंतर पोलीस कारवाई सुरु करत आहेत. याआधीच जर कारवाई करून वाहतूक कोंडी कमी केली. तसेच दुकानांतील गर्दी कमी करण्याच्या दुकानदारांना सूचना केल्या. तर गर्दी कमी होण्यास मदत होईल असे अनेक नाशिककर सांगत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com